पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यास आचारसंहितेच्या अगोदर  मान्यता देणार- ना. अजित पवार.                      

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यास आचारसंहितेच्या अगोदर  मान्यता देणार- ना. अजित पवार.                      

  To divert the water from the west to the east will be approved before the code of conduct-No. Ajit Pawar.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed21 Aug 15.00 Am.By सालकर राजेंद्र

महत्वाचे मुद्दे

आ. आशुतोष काळेला मेरिटने निवडून द्या,- अजित पवार

काळे परिवाराच्या तीन पिढ्याबरोबर मला काम करता आले मी नशिबान- अजित पवार

दहा वर्ष शिवसैनिकांनी मला दिलेली साथ विसरू शकत नाही- अशोक काळे

अजितदादांनी आशुतोषचे पालकत्व स्वीकारल्याने मी निर्धास्त- अशोक काळे

स्वतः थांबून मला संधी देणाऱ्या माझ्या वडिलांचा मला अभिमान – आशुतोष काळे

कोपरगाव : अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यास भासणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने गती द्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी आशीर्वाद दिले असून देवेंद्र फडवणीस आणि मी आम्ही तिघेहीजण येत्या आचारसंहिता लागण्याच्या आधी या योजनेला मान्यता देणार अशी ग्वाही देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही असा टोलाही त्यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात लगावला. 

विदर्भातील वैनगंगा साठी ८५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने निधी दिला आहे त्याच प्रमाणे वाढवण बंदरासाठी सुद्धा केंद्र सरकारने निधी दिलेला आहे याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी एक लाख हजार कोटी लागणार आहेत त्यासाठी केंद्राकडे आम्ही पाठपुरावा करू कारण पाणी कमी झाल्याचा प्रसंग पुढच्या पिढीवर येऊ नये यासाठी आम्हाला काम करायचे आहे असेही ते म्हणाले

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ३०० कोटी विकास कामांच्या भूमिपूजन व माजी आमदार अशोक काळे यांच्या ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ते कोपरगाव येथे आले होते यावेळी त्यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ३०० कोटी कामांच्या विकास कामांचे उद्घाटन केले त्याचबरोबर माजी आमदार अशोक काळे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. 
अजित पवार पुढे म्हणाले. अनेक वर्ष शेतकऱ्यावर लाभलेल्या आयकराबाबत मी स्वतः शिष्टमंडळासह गेल्या २५- ३० वर्षापासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत होतो यासाठी यापूर्वी प्रणव मुखर्जी असेल एंथोनी असेल चिदंबर असेल यांना भेटलो पण त्यांनी फक्त तात्पुरती स्थगिती देऊन साखर कारखानदारीवर टांगती तलवार कायम ठेवली होती. परंतु एखादे काम तडीस नेण्याची इच्छा असेल तर काय घडते  हे सांगताना अजित पवार म्हणाले,  केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या सरकारने सरसकट ९००० कोटी रुपयांची पूर्ण माफी देऊन गेल्या ३० वर्षापासून साखर कारखानदारीवर   असलेली आयकरची टांगती तलवार  बाजूला केली असल्याचे सांगितले, दादा एफ. आर. पी. चा दर दरवर्षी बदलत आहे. परंतु गेल्या चार वर्षापासून एमएसपी चादर ३१ रुपयेच आहे हा दर वाढला तर शेतकऱ्यांना अधिक चांगला दर देता येईल  तेव्हा याबाबत तुम्ही अमित शहा यांच्याशी बोलावं अशी मागणी आशुतोष काळे यांनी माझ्याकडे  केली आहे. आता अमित शहा येणार आहेत. याबाबत मी त्यांच्याकडे बोलणारच आहे. असेही पवार यांनी सांगितले,  कोपरगाव विधानसभेला तुमच्याकडे अनेक दिग्गज आहेत आज शेवटचे तीनशे कोटी रुपये विकास कामांचा रिमोट कंट्रोल दाबला आहे. मला कोणाला कमी लेखायचे नाही कारण दहा वर्ष अशोक काळे सुद्धा आमदार होते परंतु एक  सांगू इच्छितो कोपरगाव विधानसभा मतदारसंघ झाल्यापासून पाच वर्षात त्यातील दीड दोन वर्ष कोरोनात गेली असे असतानाही तीन हजार कोटी निधी आशुतोष काळे यांनी आणला याबाबत कोणाला शंका असली तर ते सिद्ध करून दाखवतो असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी दिले. मला “ताकाला जाऊन गाडग” लपवायची सवय नाही त्यामुळे स्पष्टच बोलतो मागच्या वेळेस तुम्ही आशुतोष  याला  ३६ मार्क देऊन काठावर पास केले तरीही ३००० कोटी दिले, आता  आशुतोषला मेरिट ने निवडून आणा, तुम्ही ‘लय लय मत द्या, मी लय लय निधी देतो” अशी आश्वासन त्यांनी दिले   यावर टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला अजित दादा पवार यांच्या या मिमिक्रीवर उपस्थित हसून दाद दिली.  
अजित पवार म्हणाले, पश्चिम बंगाल मधील डॉक्टरांवरील अत्याचार असो की बदलापूरची घटना वेदना देणारी आहे इकडे आम्ही मुलीला बहिणींना सन्मान देऊन सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा नराधमांना फाशी दिली तरच दरारा निर्माण होईल.  माणुसकीला  काळीमा फासणाऱ्या असे काम करण्याचे धाडस कोणाचे होऊ नये. यापूर्वी दूध भेसळ प्रकरणी फाशी देण्याचा ठराव मी केला होता परंतु केंद्राने तो थांबविला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी अजित पवार म्हणाले कर्मवीर शंकरराव काळे असो अशोक काळे असो आणि आत्ता आशुतोष काळे या तिघांबरोबर अर्थात काळे परिवाराच्या तीन पिढ्याबरोबर मला काम करता आले मी स्वतःला नशीबवान समजतो नगर जिल्हा हा थोर नेत्यांचा जिल्हा आहे  महाराष्ट्राच्या तुलनेत या एकाच जिल्ह्यात शंकरराव काळे, मारुतीराव घुले, शंकरराव कोल्हे, बापूसाहेब तनपुरे, बाळासाहेब विखे, यशवंतराव गडाख, भाऊसाहेब थोरात, नागवडे असे मोठे ताकतीचे नेते पाहायला मिळाले साखर कारखान्यात आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागात  आर्थिक  आणि वैचारिक सुबत्ता निर्माण केली. यात कर्मवीर शंकरराव काळे यांचे वरिष्ठ स्थान आहे त्यांनी  कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवला यांना स्वतःच्या शिक्षण संस्था न करता न काढता रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यास दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळला. असे क्वचितच पाहायला मिळते त्यांच्या काळातच रयतचा वेगाने विस्तार झाला रयत विस्तारीकरणात कर्मवीर शंकरराव काळे यांचे मोलाचे योगदान आहे तर आज ज्यांचा आपण सत्कार करतो त्या अशोक काळे यांनी.   साखर कारखाना चालवताना त्यांनी सातत्याने कामगार आणि शेतकऱ्यांचे ऊस उत्पादकांचे हित जोपासले  आहे.आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत विरोधी पक्षाचे आमदार असतानाही या मतदारसंघांमध्ये तहसील कार्यालय न्यायालय आयटीआय कॉलेज पशुवैद्यकीय दवाखाना या सरकारी इमारती असतील दळणवळणासाठी गोदावरी नदीवरील कुंभारी, कान्हेगाव,  चासनळी पूल असतील अशी महत्त्वाची दळणवळण व्यवस्था व पाणी प्रश्नासाठी  प्रयत्न केला. अशी महत्त्वाची विकास कामे करून आपले दायित्व पूर्ण केले आहे. मी ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्शडोळ्यासमोर ठेवून बेरजेचे राजकारण करत त्यांना मदत केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आज त्याच पावलावर पाऊल टाकून नातू आमदार आशुतोष काळे मतदारसंघ असेल की कारखाना व्यवस्थितपणे धुरा सांभाळत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे.
प्रास्ताविक करतांना आशुतोष काळे म्हणाले, मी नवखा होतो परंतु माझे वडील अशोक काळे मला नेहमी म्हणायचे मला उशिरा संधी मिळाली पण तुझ्याकडे वेळ आहे. आपल्या  लोकांसाठी तुला काम करायचे आहे. त्यामुळे पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो हरलो, त्यात आई-वडिलांचे आजारपण पराभवाचे शल्य यात  नाउमेद झालो होतो. पुन्हा वडिल अशोक काळे यांनी प्रेरणा दिली. पुन्हा कामाला लागलो लढलो, विजयी झालो, मला माझ्या वडिलांचा मला खूप अभिमान आहे कारण राजकारणात स्वतः थांबून कोणी दुसऱ्याला संधी देत नाही, त्यात वडील अशोक काळे यांनी  वयाच्या ५५ आणि ६० व्या वर्षीच  राजकारणात स्वतः थांबून मला संधी दिली. निवडणुक विजयात माझ्या जीवाभावाचे मतदार, साथी आणि अजितदादा सारखे मार्गदर्शक लाभल्यामुळे आज मी इथे पोहोचलो अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी सुजय विखे म्हणाले, खरे तर या कार्यक्रमाला नामदार राधाकृष्ण विखे यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्यक्रमाला त्यांना संभाजीनगरला जावे लागल्यामुळे मला इथे यावे लागले, मी आलो पण नेहमीप्रमाणे मला वाटले १० वाजताचा  कार्यक्रम आहे ११ वाजता सुरू होईल परंतु कार्यक्रम अजितदादांचा आहे आणि ते घड्याळावर चालतात याचा मात्र मला विसर पडला आणि इथं आल्यानंतर अजितदादांच्या वेळेच्या अनुभूतीची मला प्रचिती आली, असल्याची कबुली दिली माझ्या बोलण्याचा राजकीय अर्थ काढला जातो त्यामुळे इथे मी काही बोलणार नाही ज्याप्रमाणे गेल्या दोन पिढ्या काळे आणि विखे परिवाराचे ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध मी आणि आशुतोष काळे  एक संघ राहून कायम ठेवू  असे सांगून भाषण आवरते घेतले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती माजी आमदार   अशोक काळे म्हणाले, मी बेगडी राजकारण कधी केले नाही. ‘जे पोटात तेच ओठात” राहिले. जनतेसाठी जे केले ते प्रामाणिकपणे केले. आपल्या आठवणींना उजाळा देताना अशोक काळे म्हणाले, मी दहा वर्ष शिवसेनेचा आमदार राहिलो या काळात शिवसैनिकांनी मला फार मोठी साथ दिली. मला ते विसरता येणार नाही, आजपर्यंत मी कधी स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही मी कुणाला करूनही दिला नाही परंतु आशुतोषच्या हट्टापुढे मला नमतं घ्यावं लागलं आणि मला वाढदिवसासाठी होकार द्यावा लागला मला मुलगा म्हणून आशुतोषचा अभिमान आहे.२०१४  च्या पराभवानंतर तो थांबला नाही त्याने मतदारसंघातले प्रश्न शोधले जाणले सत्ता नसतानाही प्रामाणिकपणे प्रयत्न केला प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी आमरण  उपोषण केले, कधी धरणे धरले, तर काही वेळेस रास्ता रोको केला. चांगले वाईट प्रसंगाना  सामोरे गेला २०१९ च्या विजयानंतर तो थांबला नाही ३००० कोटी निधी अजित पवारांनी त्याला दिला त्याचा बालहट्ट पुरवला मला खात्री पटली आता  अजित पवारांनी आशुतोषचे पालकत्व स्वीकारले मी आता निर्धास्त झालो आहे २०१२ साली कर्मवीर शंकरराव काळे माझे वडिलांचे निधन झाले त्यावेळी मोठा आधार गेला मी खचलो होतो अशा प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती माजी आमदार अशोक काळे व शुभेच्छा देण्यासाठी जमलेला अथांग जन समुदाय
 
यावेळी कार्यक्रमास खासदार सुजय विखे, आमदार माणिकराव कोकाटे, आ. आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, भाऊसाहेब कांबळे, माजी झेडपी अध्यक्ष राजश्री घुले, सिद्धार्थ मुरकुटे, प्रवीण पाटील, प्रमोद जगताप, विजय वहाडणे,  कपिल पवार आबासाहेब थोरात, सौ. चैताली काळे  डॉ. सौ. मेघना देशमुख, सौ. लीना पाटील, अशोकराव पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण, बाबासाहेब कोते, पद्माकांत कुदळे, अरुण चंद्रे, सुनील गंगुले, चारुदत्त  सिनगर, कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, अधिकारी संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख चव्हाण यांनी केले. तर शेवटी आभार नारायण मांजरे यांनी मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page