फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे…”, बदलापूर घटनाप्रकरणी माजी महिला आमदार स्नेहलता कोल्हेंचा संताप
There should be death penalty…”, anger of former woman MLA Snehalata Kolhen in Badlapur incident case
महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी अशा प्रवृत्तीला ठेचले पाहिजे Such tendency should be crushed to create a sense of security among women
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed21 Aug 21.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : बदलापूर मधील नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर कोपरगावच्या पहिल्या माजी महिला आमदार स्नेहलता कोल्हेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी गुन्हेगाराला अशी शिक्षा द्या, की पुन्हा कुणाची ही महिलांकडे गैरनजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त झालेल्या बदलापुरातील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली. तसंच बदलापुरात रेल्वे रोको आंदोलनही करण्यात आले आहे.
नुकतेच रक्षाबंधन साजरे केले,त्यानंतर अशी घटना घडणे धक्कादायक आहे. अशी विकृत मानसिकता असणाऱ्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे. महिला सुरक्षा हा केवळ अत्याचाराच्या घटना झाल्यावरचा एखादा राजकीय मुद्दा न ठरता रोजच तो सर्वांनी प्राधान्याचा विषय ठेवला तर कठोर शासन होवून आरोपींना जरब बसवेल. महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी कठोर पावले शासनाने उचलावे व नराधमाना कठोर शिक्षा करावी.अशी संतप्त प्रतिक्रिया सौ.कोल्हे यांनी दिली आहे.
Post Views:
49