दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या साक्षीने व संतांच्या हस्ते गोदातीरी कृष्ण जन्म सोहळा 

दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या साक्षीने व संतांच्या हस्ते गोदातीरी कृष्ण जन्म सोहळा

Godatiri Krishna birth ceremony witnessed by Godavari river overflowing and at the hands of saints

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Tue,267 Aug 19.10 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव:  गेल्या दोन दिवसापासून नाशिकसह कोपरगाव येथे होणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदी दुधडी भरून वाहत होती चौथा श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी असा योग आल्याने महाआरतीच्या निमित्ताने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या साक्षीने व संतांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्म सोहळा  पार पडला.हजारो भाविकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला.

विवेक कोल्हे यांच्या संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक श्रावणी सोमवारी गोदावरी तीरी महा आरतीचे आयोजन केले जाते.
कृष्ण जन्माची पूजा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे या उभयतांच्या हस्तेकरण्यात आली यावेळी त्यांनी उपस्थित संतांचे पाद्यपूजन केले. “हर हर महादेव…. व ‘ हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की’ या जयघोषाने व बोटीतून होणारी फटाक्यांची आतिषबाजी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने  संपूर्ण गोदातीर लखलखून गेला.

महंत रमेशगीरी महाराज,महंत राघवेश्वरनंदगिरी (उंडे) महाराज,महंत शारदामाता, महंत सरलादीदी,महंत गोवर्धनगिरी, महंत कैलासगिरी,महंत विकासमहाराज, ह.भ. प लव्हाटे महाराज आदींसह मोठ्या संख्येने नागरिक,भाविक उपस्थित होते.

यावेळी रमेशगिरी महाराज म्हणाले, श्रावण हा पवित्रा आणि मोठे महत्त्व असलेला महिना आहे त्यात प्रत्येक श्रावणी सोमवारी गोदामातेची महाआरती करणे यातून विवेक कोल्हे यांचा युवकांना आदर्श दिशेला घेऊन जाण्याचा विचार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी युवा प्रतिष्ठानने अध्यात्मिक संस्कृती जतन करण्याचे काम केले आहे आणि त्यांना निश्चितच गोदावरी मातेचे पवित्र आशीर्वाद मिळणार आहेत भाविकांनी अशा कार्यक्रमाचा नेहमी लाभ घ्यावा असेही ते म्हणाले,

यावेळी सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या शेतकऱ्यांची आणि जनतेची तहान भागविणारी गोदावरी नदी ही या परिसराला समृद्ध करणारी जीवनदायी आहे गोदामातेची महाआरती हा आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा जतन करण्याचा सोहळा आहे कुटुंबाने सातत्याने अध्यात्म आणि धार्मिक परंपरा बरोबर सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न केला आहे असे उपक्रम राबवणारे संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे व त्यांचे युवासेवक  ही खऱ्या अर्थाने ऊर्जा आहे असे गौरवउद्गार त्यांनी व्यक्त केले

यावेळी सौ स्नेहलता कोल्हे यांनी चारही सोमवार बोटीची मदत देत पाण्यातून फटाक्यांची आतिषबाजी करणारे माजी नगरसेवक अनिल(कालूआप्पा) आव्हाड, किरण आव्हाड,सागर पंडोरे,प्रवीण पंडोरे, किरण सिनगर,सोमनाथ आहेर,शुभमआव्हाड यांचे कौतुक केले व पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांचे आभार मानले.

चौकट
श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी हा दुग्ध शर्करा योग साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला.भाविकांच्या मधून डोक्यावर टोपलीत बालश्रीकृष्ण घेऊन वासुदेव हे नंद आणि यशोदा माता यांच्याकडे घेऊन जातानाचा प्रसंग सादर करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page