कोपरगावात मालवण राजकोट घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी रस्त्यावर झावरे यांचा खळबळजनक आरोप
In protest of Malvan Rajkot incident in Kopargaon, sensational accusation by Zaware on the road of Mahavikas Aghadiमागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदनStatement of demands to Naib Tehsildar
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed,28 Aug 15.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील पुतळा कोसळल्यानंतर विरोधक महाविकास आघाडी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. मविआ’ च्या वतीने कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे दुपारी एक वाजता ठिय्या आंदोलन केलं, यानंतर येथील नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या आंदोलनाला महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळा उभारून लोकसभा निवडणुकीआधी इव्हेंट करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत भाजपने खेळ केला आहे, ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या ठेकेदाराला २३६ कोटी रुपयांचा ठेका दिला. एका पुतळ्यासाठी एवढी रक्कम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक असा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केला. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे म्हणाले महाराष्ट्र सह देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची अक्षम्य घटना महाराष्ट्रातील शिवसैनिक व तमाम नागरिकांना यातना देणारी आहे.ताशी ४५ किलोमीटर वेगाने झाडावरचं साध नारळ देखील पडत नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला या मुख्यमंत्र्यांच्या बेताल आणि हास्यास्पद वक्तव्यावर त्यांनी जोरदार शब्दात टीका केली. बदलापूर आणि राजकोटच्या घटनेचे विरोधक राजकारण करीत असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतानाच लोकांनी आपल्या संवेदना व्यक्त करायच्या नाहीत का ? असं संतप्त सवाल करून वर्पे यांनी महायुती सरकारचा निषेध केला.
राज्यपालांनी मालवण जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाममंत्री भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, सरकार बरखास्त करावे संबंधितांवर गुन्हे दाखल करावे या मागण्यांचे निवेदन कोपरगाव नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्य प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे, कैलास जाधव, शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख सनी वाघ, किरण खर्डे भावेश थोरात, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार पोटे यासह भरत मोरे, कलविंदरसिंग दडियाल, रवी कथले, प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, आशिष निकुंब, मधुकर पवार आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views:
52