गौतमी पाटलांच्या नृत्याच्या कार्यक्रमावर विवेक कोल्हेंचे संयमी भाष्य; विरोधकांना अचूक टोला
Vivek Kolhe’s restrained commentary on Gautami Patal’s dance program; Accurately taunt opponents
छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी, संजीवनी युवा प्रतिष्ठान Chhatrapati Shivaji Maharaj Dahi Handi, Sanjeevani Youth Foundation
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed,28 Aug 17.10 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : मंगळवारी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज या मानाच्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात “महिलांना नाचवायच्या नाही तर वाचवायचे” असे बॅनर गोविंदांनी झळकवले त्याची चांगली चर्चा झाली. यावर विवेक कोल्हे यांनी यातून त्यांची मानसिकता दिसून येते आपल्याला आदर्श युवक घडवायचे आहेत असे संयमी भाष्य करून विरोधकांना अचूक टोला लगावला.
शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा …
मासाहेब जिजाऊ यांच्या उपस्थितीत शिवरायांनी कठोर शिक्षा देण्याचे फर्मान दिले, त्वरित भिकाजी गुजर उर्फ बाबाजीची पाटीलकी जप्त केली गेली. इतकेच नव्हे तर त्याला या दुष्कर्माबद्दल त्याचे हात पाय कलम केले गेले. त्याला चौरंगा केला ही नाटिका स्थानिक कलाकारांनी सादर केली. या नाटिकेला उपस्थित हजारो हजारो प्रेक्षकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून दाद दिली.
अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न करूनही दंडी दहीहंडी फुटली नाही. त्यामुळे काही उंची कमी सर्व पथकांकडून सामूहिकपणे दहीहंडी फोडण्यात आली. दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले.
स्वतः विवेक कोल्हे यांनी गोविंदा होऊन तिसऱ्या थरावर जाऊन दहीहंडीचा थरार अनुभवला त्यांच्या या धाडसाला गोविंदा पथकानी व उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक गोविंदा पथक नागरिक महिला भगिनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते.