धामोरीला विकासासाठी मोठा निधी दिल्याची आमदार आशुतोष काळेंच्यासमोर घामोरी ग्रामस्थांची कबुली 

धामोरीला विकासासाठी मोठा निधी दिल्याची आमदार आशुतोष काळेंच्यासमोर घामोरी ग्रामस्थांची कबुली

Dhamori villagers confessed to MLA Ashutosh Kalen that they have given huge funds for development of Dhamori

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Wed,28 Aug 20.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावांप्रमाणे धामोरी गावचे देखील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. हे विकासाचे प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविले असून त्यांच्या कार्यकाळात धामोरीच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याची कबुली  धामोरी ग्रामस्थांनी आमदार आशुतोष काळे यांच्यासमोर दिली आहे.

धामोरी येथे आ.आशुतोष काळे यांनी विविध विकासकामांची पाहणी करून शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला व विकास कामांबाबत याप्रसंगी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला . 

त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी सांगितले की, मतदार संघाच्या विकासासाठी आणलेल्या निधीचा आकडा साडे तीन हजार कोटीवर पोहोचला आहे. यापुढील काळात त्यामध्ये अधिकची भर पडणार असून मतदार संघात जी काही विकासकामे शिल्लक आहेत त्या कामांना देखील निधी मिळून हि कामे पूर्ण करणार आहे. धामोरी ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा पूल,ज्या पुलामुळे धामोरी गावचा चासनळी परिसराशी संपर्क तुटत होता व कोपरगाव चास नळी वाहतूक बंद होत होती. त्या प्रजिमा-४ वरील धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. तसेच धामोरी गावातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देर्डे फाटा-मोर्विस (सात मोऱ्या) रस्ता देखील पूर्ण झाला आहे. त्यामुळे चासनळी, मोर्वीस, वडगाव, बक्त्तरपूर, हंडेवाडी आदी गावातील नागरिकांना कोपरगावला जाण्यासाठी व धामोरी, मायगाव देवी व तसेच मोठी लोकसंख्या असलेल्या सांगवी भुसारच्या नागरिकांना चासनळी येथे जाण्यासाठी व लासलगाव, विंचूर, बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीला घेवून जाण्यासाठी येणारी रस्त्याची अडचण दूर झाली आहे. उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. धामोरी परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न सुटल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page