काळे साखर कारखान्याने उसाला उच्चांकी ३०५० रुपये दर दिला -आ. आशुतोष काळे
Sugarcane with kale sugar reached a high of Rs.3050-A. Ashutosh Kale
साखर उद्योगासाठी धरसोड धोरण ऐवजी संपूर्ण हंगामासाठी एक निश्चित धोरण असावेFor sugar industry there should be a fixed policy for the whole season instead of a dharsa policy
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sat31 Aug 18.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या उसास प्रति टन तीन हजार ५० रुपये उच्चांकी दर दिला असल्याची घोषणा चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.
शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ७१ व्या आधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. आशुतोष काळे बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
महत्त्वाच्या मागण्या
साखर उद्योगासाठी केंद्राने धडसोड धोरणाऐवजी संपूर्ण हंगामासाठी एक निश्चित धोरण ठेवावे व त्याची हंगामा आधीच घोषणा करावी इथेनॉलचा दर निश्चित करावा साखरेचे दर ४२०० रुपये करावे या मोठया मागण्या आ. आशुतोष काळे यांनी केल्या
८०० टनाचा कारखाना आपण ६००० टनावर नेला आहे आपली आपल्याशी स्पर्धा आहे याची त्याची तुलना करू नका ऊस दराची चिंता करू नका तोडणी वाहतूक वजा जाता या एफ आर पी प्रमाणे २५२७ रुपये दर असताना आपण पहिला हप्ता २८२५ रुपये प्रति टन दिला. मध्ये १०० रुपये प्रति टन दिले आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी १२५ रुपये प्रमाणे प्रति टन उसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. ‘ काळे कारखान्याने’ अडचणीच्या काळात तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप करून त्यांना आर्थिक स्थिरता देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची जादा दर देण्याच्या मागणीचा काळे कारखाना प्रशासनाने सकारात्मकदृष्ट्या विचार केलेला असून, यापुढेही सर्वाधिक दर देऊन ऊसबिले वेळेवर अदा केली जाणार असल्याचे आ. काळे यांनी स्पष्ट केले आहे.
आ आशुतोष काळे म्हणाले मागच्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारचा अंदाज चुकला, इथेनॉल आणि निर्यात बंदीमुळे साखर उत्पादन वाढले आणि साखरेचे दर घसरले आज राज्यात अतिरिक्त बावीस लाख मॅट्रिक टन साखरेचा साठा पडून आहे सरकारच्या धरच साखर उद्योगाच्या बाबतीत सरकारच्या धरसोड धोरणांचा मेसेज गेल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या इमेजला धोका पोहोचला मागचा हंग मागचा संपूर्ण हंगाम इथेनॉलला बंदी होती परंतु आता केंद्र सरकारने बंदी उठवली या निर्णयाचे मी स्वागत करतो इथेनॉल निर्मितीमुळे साखर उत्पादनावर अंकुश येऊन चांगले साखर दर मिळतील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यामुळे परकीय चलन वाचणार आहे पेट्रोलमध्ये ऊस मळी पासून बनलेले ४५% टक्के इथेनॉल तर धान्यापासून निकृष्ट धान्यापासून बनलेले ५५% इथेनॉल वापरण्यात येणार आहे. त्यामुळे इथेनॉलचा दर निश्चित केल्यास त्याचा शेतकरी आणि कारखाना दोघांनाही फायदा होणार आहे. साखर साठा पडून राहिला तर कारखानदाराचा पैसा अडकून राहतो त्यांचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे एफ आर पी देण्याचा अडचण येतात असेही काळे म्हणाले
आयकर माफीचा प्रस्ताव दाखल केला आहे त्याबाबत सकारात्मक निर्णय येऊन मोठा दिलासा मिळेल याबाबत मी केंद्राचे आभार मानतो गेल्या पाच वर्षापासून साखरेचे दर ३१०० आहे ते आता ४२०० रुपये करावी अशी मी विनंती करतो सरकारने एफ आर पी धोरणाला एम एस पी लिंक करून जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली
कर्ज काढून आपण कारखान्याचे आधुनिकीकरण असले तरी आता लॉसेस कमी होतील मागच्या हंगामापेक्षा या हंगामात सर्व अडचणी सोडवुन प्रतिदिन ६००० क्षमतेने सुरळीत चालू अनेक फायदे होणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आपली साखर दर्जेदार असणार आहे आपल्याला चॉकलेट आणि कारखान्यांना साखर पुरवण्याची परवाना मिळाला आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच चांगली मागणी राहणार आहे
तिकडे काळे कारखान्याने गत हंगामात उच्चांकी गाळप करताना आठ लाख ४५ हजार ७३४ मॅट्रिक टन उसाचे गाळप केले त्यातून नऊ लाख ५३ हजार ३०० पोते साखर मिळवली यावेळी उतारा ११.२९% मिळाला
महत्वाचे ठराव
विषय ११ सहा मेगा वॅट चे टरबाइन घेणे, विषय १२ पंधरा वर्षे जुनी झालेला डिसलरी प्लांट मल्टीप्रेशर डिसलरी करायची आहे,
विषय क्रमांक १० छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या विद्यालयांची दुरावस्था झाली आहे त्यांच्या विद्यालयांचे नूतनीकरण करण्यासाठी आपली जमीन रयत संस्थेला हस्तांतर करावी लागणार आहे. या तिन्ही ठरावाला आपण मान्यता द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली. उपस्थित सभासदांनी टाळ्याच्या गजरात या तीनही विषयांना मान्यता दिली विषय पत्रिकेवरील एक ते तेरा विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे सर यांनी केले अहवाल वाचन कार्यकारी अधिकारी एस एस कोल्हे यांनी केले श्रद्धांजली वाचन व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी केले तर शेवटी आभार माजी चेअरमन सूर्यभान कोळपे यांनी मानले. यावेळी जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला