डिजिटल युगातही बुद्धिबळ खेळले जात आहे ही अभिमानाची गोष्ट-सौ स्नेहलता कोल्हे
It is a matter of pride that chess is being played even in the digital age-Sau Snehlata Kolhe
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sat31 Aug 19.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : पाच वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील स्पर्धक सहभागी झाल्याचे बघून आजच्या डिजिटल युगातही बुद्धिबळ खेळले जात आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवउद्गार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी ‘विवेक कोल्हे बुद्धिबळ चषक’ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
उद्घाटनाच्या निमित्ताने बुद्धिबळाच्या पटावर सौ. स्नेहलता कोल्हे यांचा ‘चेकमेट”
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, बुद्धिबळ हा हळू हळू विचारपूर्वक चाली चलत खेळला जाणारा हा खेळ फार प्रसिद्ध आहे. खूप हुशार असणारेच हा खेळ खेळू शकतात असही म्हंटल जात. हा खेळ म्हणजे रणनीती आणि चातुर्य याचा योग्य मेळ घालून खेळला जाणारा खेळ आहे. तरुण पिढीची जपवणूक करण्यासाठी मोबाईलच्या विळख्यातून त्यांना बाहेर काढणे काळाची गरज झाली आहे बुद्धिबळ सारखे उपक्रम राबवून युवा नेते विवेक कोल्हे यांनी नेहमीच तरुणांना प्रोत्साहन दिले आहे. नव्या पिढीसमोर आपण काय आदर्श ठेवतो याची जाणीव ठेवून कृती केल्यास त्यातून सामाजिक जडणघडण उत्तम होते असे त्या शेवटी म्हणाल्या,
यावेळी विजयशेठ बंब,राजेश ठोळे,यश विसपूते,संभाजी बोरनारे,नितीन सोळके, प्रमोद वाणी,संकेत गाडे,महेश थोरात,राजेंद्र कोळपकर, राजेंद्र कोहकडे, रंजय त्रिभुवन, उदय देशपांडे,सुमित गुप्ता,रमेश येवले,किरण कुलकर्णी,शिवप्रसाद घोडके,गुरजित सिंग, सागर गांधी,अतुल शालीग्राम, शिवप्रसाद काळे, जसविंदरसिंग आदींसह स्पर्धा समितीचे सर्व सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
Post Views:
42