अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांच्याकडून ‘दहीहंडी वचनपूर्ती” २०२४’चे आयोजन
Ajit Pawar Group A. Organized by Ashutosh Kale ‘Dahihandi Vachanpurti’ 2024′
सबसे कातिल…` आशुतोष काळे च्या ‘दहीहंडी वचनपूर्ती”त थिरकली गौतमी पाटीलGautami Patil danced in Ashutosh Kale’s ‘Dahihandi Vachanpurti’.
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Fir30 Aug 20.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ‘दहीहंडी वचनपूर्ती २०२४’ चे आयोजन केलं होतं. या दहीहंडीला नृत्यांगना गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. यावेळी ती विविध गाण्यांवर थिरकल्याचे पाहायला मिळाले.
सबसे कातिल गौतमी पाटील……
महाराष्ट्राला आपल्या डान्सनं वेड लावणारी गौतमी दहीहंडीच्या निमित्तानं कोपरगावात आली आणि कोपरगावकरांना देखील तिनं तिच्या तालावर नाचवलं. गौतमी आली आणि तिनं एंट्री घेताच हजारो लोकांचं लक्ष वेधलं. सबसे कातिल गौतमी पाटील… या प्रसिद्ध गाण्यावर गौतमी थिरकली. पुण्या मुंबईप्रमाणेच कोपरगावमध्ये देखील गौतमीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
गौतमीनं कोपरगावच्या कार्यक्रमात डान्स सादर केले. “सबसे कातिल गौतमी पाटील…” ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’…. ‘बांगडी टिचली’… या गाण्यानंतर गौतमीनं थेट पावन जेवला काय? म्हणत पुन्हा एकदा ठेका धरला. थेट डोक्यावर पदर घेत गौतमीनं सर्वांची मनं जिंकली.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले, प्रामाणिकपणे जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवून तुम्ही २०१९ ला दिलेल्या संधीचे सोने केले, पाच वर्षात केलेल्या कामांच्या वचनपूर्तीची दहीहंडी आहे यापुढेही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, अशी भावनिक साद आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित जनसागराला घातली.
आ. आशुतोष काळे यांच्याविषयी गौतमी म्हणाली माझा ‘माझी लाडकी बहिण’ असा उल्लेख करणाऱ्या आशुतोषदादांना कलाकार आणि महिलाप्रती असलेला आदर दिसून येतो. ज्याप्रमाणे राज्यातील जनतेचे आमच्यावर प्रेम आहे त्याप्रमाणे कोपरगावकरांचे त्यांच्यावर प्रेम आहे. आम्ही राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले पण कोपरगावसारखी सुविधा आजवर कुठेही मिळाली नाही
यावेळी नृत्यांगना गौतमीला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमा झाली होती. विशेष म्हणजे गौतमीच्या नृत्य कलाविष्कार पाहण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी केली होती.
गौतमी येणार म्हटल्यावर गर्दी, राडा होण्याची दाट शक्यता असते. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला होता.
शिर्डी इगतपुरी घोटी येथील गोविंदा पथकांनी सात थर रचले परंतु त्यांना दहीहंडी फोडता आली नाही. त्यामुळे दहीहंडी कमी उंचीवर घेण्यात आली दोन थर चढत आमदार आशुतोष काळे यांनी दहीहंडी वचनपूर्तीची फोडली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चौकट
दहीहंडी सोहळ्यात बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर “मित्रा स्वत:च्या बहिणीसाठी वाघ असशील, मात्र दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होवू नकोस” अशा आशयाचे बॅनर गोविदांनी झळकविले
Post Views:
46