विवेक कोल्हे‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, उद्धव ठाकरे की शरद पवार …
Vivek Kolhe in the role of ‘wait and watch’, Uddhav Thackeray and Sharad Pawar…
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Fir6 Sep 19.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : महायुतीत असल्यामुळे फार्मूल्याचा विचार करता कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने भाजपाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले विवेक कोल्हे शरद पवार यांच्या गाडीत बसून गेले, मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात आहे. तरीही विवेक कोल्हे‘ यांनी कार्यकर्त्यांना “वेट अँड वॉच” असा सल्ला देत उद्धव ठाकरे की शरद पवार यापैकी कुणाकडे याबाबत मात्र सध्या मौन पाळले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे
सध्या भाजपत सक्रीय विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांनी भाजपाकडून लढताना २९ हजारापेक्षा अधिक मते घेतली. २०१९ ची विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांनी पुन्हा शिवसेना भाजप युतीतून निवडणूक लढविली आणि अवघ्या आठशे मतांनी त्यांचा पराभव झाला. असे असले तरीही कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोल्हे यांचे संघटन मजबूत आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांचे युवकांसोबताच तर बचत गटाच्या माध्यमातून सौ. स्नेहलता कोल्हे यांनी महिला व युवतींच्या संघटनेची अतिशय मजबूत बांधणी त्यांनी केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीकडे दुरूनच ते सर्व बघत आहेत. महायुती असल्यामुळे आणि फार्मूला हा विचार करता कोपरगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे. तसा आ. आशुतोष काळे यांनी प्रचारही सुरू केला आहे. मात्र कोल्हे यांनी अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही. महायुती सरकारमध्ये कोल्हे सहभागी आहेत. सगळीकडे उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मात्र महायुतीत कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे.
कोल्हे यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हीकडून सोबत येण्याचे निमंत्रण असणार यात शंका नाही असे असले तरी सध्या कोल्हे हे या दोघापासूनही दूर आहेत. सध्या तरी ते वेज अँड वॉच च्या भूमिकेत दिसतात. कोल्हे हातात मशाल की तुतारी घेणार याबाबत मात्र सातत्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र कोल्हे यांनी अद्यापही याबाबत मौन सोडलेले नाही.
तसे नगर जिल्ह्यात कोल्हे हे मोठे प्रस्थ आहे आज जरी त्यांची राजकीय अडचण झालेली दिसत असली तरी कोल्हे हे केवळ कोपरगाव पुरते नाही तर ते शिर्डी, वैजापूर, येवला, निफाड व नासिक याचबरोबर शिक्षक मतदार संघात उमेदवारी करून विवेक कोल्हे यांनी प्रस्थ आणि संपर्क वाढवला आहे त्यामुळे कोल्हे यांचे उपद्रव्य मूल्य आणि उपयुक्तता दोन्हीही नाकारता येणार नाही त्यामुळे कोल्हे आपल्याकडे यावे यासाठी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार दोन्हीकडूनही प्रयत्न सुरू आहेत कोल्हेसारखा हुकमी एक्का आपल्या ताब्यात हवा आहे.कारण कोल्हे आल्यानंतर शिर्डी येवला, वैजापूर, नाशिक, निफाड, नगर जिल्हा या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपला पाय भक्कम करण्यासाठी त्यांना कोल्हे यांचा कोपरगावसह आसपासच्या मतदार संघात असलेल्या प्रभावाचा मोठा उपयोग होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर संघर्षाच्या काळात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी शरद पवार यांना किती मोलाची साथ दिली हे पवार जाणून आहेत. आजही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर संघर्षाची वेळ आली आहे. अशा वेळेस कोल्हे यांची साथ मिळावी यासाठी ते नक्कीच आग्रही असतील तर दुसरीकडे कोपरगाव ची जागा शिवसेनेचीच होती २०१४ साली कोल्हे यांनी शिवसेनेचे तिकीट मागितले होते परंतु काही कारणामुळे त्यावेळेस त्यांना भाजपचे तिकीट घ्यावे लागले त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या हातातून गेली अन्यथा कोपरगाव विधानसभेची शिवसेनेची हॅट्रिक झाली असती. त्यामुळे शिवसेनाही कोल्हे यांची उपयुक्तता जाणून आहे म्हणून तेही कोल्हे यांना आपल्याकडे खेचण्याचा आग्रह व प्रयत्न निश्चित केल्याशिवाय राहणार नाहीत. हे जरी सर्व सत्य असले तरी आज मात्र विवेक कोल्हे‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, उद्धव ठाकरे की शरद पवार … की भाजपच याबाबत अद्यापपर्यंत तरी कोल्हे यांनी मौन धारण केले आहे