कोपरगावकरांसाठी सुवर्णक्षण…  पाच नंबर साठवण तलावातील पाण्याचे होणार जलपूजन 

कोपरगावकरांसाठी सुवर्णक्षण…  पाच नंबर साठवण तलावातील पाण्याचे होणार जलपूजन

Golden moment for Kopargao residents… Jalpuja will be held for the water of five number storage ponds

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Mon9 Sep 16.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : नांदूर मधमेश्वरप्रकल्पातील पाणी कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावात प्रवाहित झाले असून याचे जलपूजन रविवारी  होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी सोमवारी (दि.९) रोजी साई तपोभूमी येथील सभागृहात दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पाच नंबर साठवण तलावात पाणी पोहोचलेय ! हा आपल्या अथक प्रयत्नांचा, पूर्णत्वाचा,व स्वप्नपूर्तीचा क्षण आहे रविवारी  पाच नंबर साठवण तलावातील पाण्याचे जलपूजन आपल्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी पत्रकारांना केले.

यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचे स्वप्न आपल्या प्रयत्नातून साकार करताना केलेल्या नऊ दिवसाच्या आंदोलनापासून प्रस्ताव दाखल करणे समृद्धी महामार्गासाठी माती वाहून नेणे यासह झालेल्या  प्रवासातील प्रयत्नांचा व अडचणींचा पाढा त्यांनी यावेळी वाचला विरोधकांच्या कारवायांचा उल्लेख करून १३१  कोटीचा निधी मिळवला त्याचबरोबर नगरपालिकेच्या २० कोटी लोकवर्गणीची सूट मिळवली हे सांगताना सर्व अडीअडचणीतून आज साठवण तलावाचे काम  जवळजवळ पूर्ण झाले  असल्याने साठवण तलावात पाणी प्रवाहित झाले आहे. या पाण्यामुळे कोपरगाव शहरातील जनतेचे नियमित स्वच्छ पाण्याचे दोन पिढ्याचे स्वप्न साकार होत आहे. असेही ते म्हणाले

कोपरगाव शहराच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे हा सुवर्णक्षण आपण नक्कीच साजरा करणार आहोत रविवारी (दि. १५सप्टेंबर) रोजी दुपारी तीन वाजता येसगाव पाच नंबर साठवण तलाव येथे जलपूजन समारंभ होणार आहे. या जलपूजन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समस्त शहरवासियांनी विशेषता ज्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.  अशा महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

चौकट 
यावेळी पत्रकारांनी साठवण तलावाची क्षमता किती दिवसांची आहे? योजना सुरू झाल्यानंतर सर्व  प्रभागातील सर्व भागात सारखे पाणी येणार का ? सर्वांना सारखे पाणी मिळणार का?  आवर्तन किती दिवसांनी येणार ? या योजनेत पाणी शुद्धीकरण करण्याची व्यवस्था वाढविण्यात आली आहे का ? योजना सुरू करण्यापूर्वी संपूर्ण  योजनेच्या सर्व चाचण्या घेणार का ? असे अनेक संबंधित विविध प्रश्न आणि तळ्याची खोली दोन फूट कमी केले  असल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आ. आशुतोष  काळे यांनी ही पालिकेची जबाबदारी असून आपणही योजनेच्या मसुद्याप्रमाणे सर्व कामे झाली आहेत की नाही याची खातर जमा करून घेणारच असल्याची ग्वाही दिली पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी आपण स्वतः मालिकेच्या भरवशवर  न बसता यात लक्ष घालून संपूर्ण योजना सदोष झाली आहे की नाही ? याची तपासणी करावी असे सांगितले त्यावर त्यांनी सर्व गोष्टीची आपण तपासणी खातर जमा करून  घेणार असल्याचे  उत्तर दिले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page