गणराय हे ‘स्त्री शक्तीला” मानाचे स्थान देणारी देवता –  सौ रेणुका कोल्हे

गणराय हे ‘स्त्री शक्तीला” मानाचे स्थान देणारी देवता –  सौ रेणुका कोल्हे

Ganaraya is the deity who honors the ‘female power’ – Sau Renuka Kolhe

होम मिनिस्टर : खेळ पैठणीचा कार्यक्रमाला वारी येथे महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Mon9 Sep 16.30 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : महिला या बुद्धिमत्ता आणि कर्तुत्वाने कोठेही कमी नाहीत घर कामाव्यतिरिक्त प्रत्येक क्षेत्रात अभिमान वाटावे असे महिलांचे काम आहे श्री गणरायाच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी  यांना स्थान दिले कारण  गणराया हे स्री शक्तीला मानाचे स्थान देणारी देवता असल्याचे प्रतिपादन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ रेणुका कोल्हे यांनी वारीगाव येथे गणेशोत्सव निमित्त ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात केले. यावेळी महिलांची प्रचंड गर्दी होती.

सौ रेणूका कोल्हे पुढे म्हणाल्या चूल आणि मूल या पलीकडे जाऊन गौरी असलेली महिला प्रसंगी दुर्गा ही बनते महिला काय करू शकतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे संसाराचा गाडा भक्तांना हा करताना कुठेतरी विरंगुळा मिळावा यासाठी स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून होम मिनिस्टर हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो महिला शक्तीचा जागर व्हावा यासाठी असे उत्सव केंद्र आहे.   कोल्हे कुटुंबाने जनसामान्याचे प्रश्न सोडवून जनसेवा हाच मोठा धर्म मानला आहे. त्यामुळे स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या काळात वारीगावात अनेक विकास कामे केली आज विवेक कोल्हे सातत्याने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर आहेत, महिला संघटन करून स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास चाळीस हजार महिला जोडलेल्या असून त्यांना कौटुंबिक आर्थिक हातभार लावण्यास बचत गट मोलाचे ठरले आहेत.
 ज्या घटना आपण ऐकतो महिला अत्याचार घडतात त्यावर कठोर कृती होण्यासाठी सर्वप्रथम महिला सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी बचत गटाच्या ऐक्याची देखील भूमिका महत्वाची ठरणार आहे.कोल्हे कुटुंबाने आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेल्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित असणे हे एक प्रकारे जगदंबा मातेचे आशीर्वाद आहेत असेही मत शेवटी सौ.कोल्हे यांनी व्यक्त केले.
प्रा.गणेश कांबळे आणि सुमित काळोखे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणली.उपस्थित महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे,उखाणे,खेळ यातून  वातावरण अगदी आनंदमय झाले होते.यावेळी वारी आणि पंचक्रोशीतील महिला भगिनी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page