रोजगार उपलब्धी हा कोपरगावचा सामाजिक प्रश्न बनला आहे – विवेक कोल्हे
Employment attainment has become a social issue of Kopargaon – Vivek Kolhe
मतासाठी जल पूजनाचा इव्हेंट- बिपिन कोल्हे
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Thu18, Sep 11.20 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : काळाच्या ओघात आपल्या पाण्याचा प्रश्न जटिल झाला आणि तालुका अडचणीत आला रोजगार उपलब्धी हा कोपरगावचा सामाजिक प्रश्न बनला असल्याचे प्रतिपादन औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी मंगळवारी (दि.१७)रोजी औद्योगिक वसाहतीच्या १४ कोटी ५२ लाख कामाचे प्रास्ताविक करताना केले. अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.
विवेक कोल्हे म्हणाले कि, “लग्नासाठी तरी मुलाला नोकरी लावा’ असे म्हणणारे पालक रोज येतात बारकाईने अभ्यास केला तर माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, दूधसंघ, पोल्ट्री इंजिनिअरिंग कॉलेज, खत कारखाना, अशा जोड प्रकल्पासह नॅशनल हेवी पुणे, रयत शिक्षण संस्था, एसटी महामंडळ, शिर्डी साईसंस्थानमध्ये तर सुमारे ६०० पेक्षा जास्त तरुण आज काम करत आहेत या सर्व माध्यमातून त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देताना कोपरगावच्या अर्थकारणाला चालना देण्याचा त्यांचा मानस राहिला.आज कोपरगावच्या सिंचनासाठी केवळ एकवीस टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे कोपरगावची बाजारपेठ शेतीशी निगडित आहे शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आले तरच येथील बाजार पेठेला चालना मिळते पाण्यामुळे वाढीव उद्योगाला परवानगी मिळत नाही आता इथे केवळ वॉटर लेस इंडस्ट्री हा एकमेव स्कोप राहिला आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली एकेकाळीचे कोपरगाव आज स्पर्धेच्या युगात कुठे मागे पडते आहे काय याचे चिंतन करण्याचा विषय झालेला आहे त्या अनुषंगाने औद्योगिक वसाहत म्हणून आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यावेळेस राजकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर कोपरगाव शिर्डी ग्रीन सिटी होऊन २० ते २५ हजार रोजगार उपलब्ध झाले असते दुर्दैवाने काही कारणास्तव ते होऊ शकले नाही एमआयडीसी साठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने १० हजार सह्या गोळा केल्या दुर्दैवाने वारी संवत्सरला पाणी नसल्याने ती एमआयडीसी सोनेवाडीला गेली संजीवनी कॉल सेंटर बजाज फायनान्स सेल प्रोसेस भारतातील सेकंड लार्जेस्ट प्रोसेस आहे १०० कोटीचा व्यवसाय या कॉलसेंटरमध्ये होत असून महिन्याला चार कोटी रुपचे पगार वाटला जातो याचा अर्थ शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग कमी नाही हे सिद्ध होते असेही विवेक कोल्हे म्हणाले,
बिपिन कोल्हे म्हणाले माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावच्या पाण्यासाठी मुकणे, भाम,भावली, वालदेवी कश्यपी या धरणांना चालना दिली एवढ्यावरच न थांबता कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी कोपरगाव नगरपालिकेला साठवण तलावासाठी २५ एकर सुपीक जमीन मिळवून दिली. त्या जमिनीतच काल-परवा पाच नंबर तळ्याचं जलपूजन करण्यात आले धरण आणि जमीन नसती तरी तळं झालं असतं का ? ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ ‘विहिरीत असलं तरच माठात’ येईल, कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी सर्व काही मीच केलं याने हरकून जावून स्वतःच हळद लावून बाशिंग बांधल अशा आपल्या खास शैलीत शाब्दिक प्रहार करून मतासाठी जलपूजनाचा इव्हेंट करणाऱ्या आ. आशुतोष काळेला इतिहासाची जाणीव करून दिली.
बिपिन कोल्हे पुढे म्हणाले, शेती पाण्याच्या प्रश्न आहे अनेक जणांना आता शेतीचे एक आवर्तन कमी होण्याची भीती वाटते आहे. म्हणून आम्ही निळवंडे धरणातून पाणी घ्या म्हणत होतो निळवंडे धरणातून पाणी घेतलं असतं तर आज शेतकरी सुखाचे जीवन जगला असता, उद्योजक आणि शेतकरी ही आर्थिक रथाची दोन चाक आहेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही हीच परीस्थिती आहे. स्थानिक राजकारण्यांवर नाव न घेता हल्ला चढवितांना जनतेला ३ हजट कोटीच्या विकासाच्या बाता मारुन सत्तेत बसलेल्यांनी त्याच्यातले १ हजार कोटी जरी पाण्यासाठी आणले असते तर उद्योजक आणि शेतकरी दोघेही समृद्ध झाले असते, अजूनही वेळ गेलेली नाही आचारसंहिता लागायच्या आत १ हजार कोटी आणा असे आवाहन कोटीच्या वल्गना करणाऱ्यांना केले.
यावेळी काका कोयटे म्हणाले गावची प्रगती होण्यात उद्योग व व्यापाऱ्यांची सांगड असणे खूप महत्त्वाचे आहे हे व्हिजन असलेल्या माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ६०-६५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात औद्योगिक वसाहत स्थापन केली शिक्षणासाठी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली हजारो शेतकरी आणि सामान्य माणसांची मुले इंजिनियर झाली त्यांच्या सत्याग्रही शेतकरी या आत्मचरित्रात कोपरगावचे कांतीलालशेठ अग्रवाल, कैलासशेठ ठोळे व काका कोयटे ही तीन माणसे कोपरगाव चे नाव भारतात नव्हे तर परदेशात वाढवतील आज ते सर्व सत्य झाले आहे कोल्हे कुटुंबाने विवेक कोल्हे यांना पहिली राजकीय संधी औद्योगिक वसाहतीचे संचालक म्हणून दिली छोट्या छोट्या तरुणांना उद्योगाची संधी देण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि व्यापारी संघ मिळून ‘स्मॉल स्केल एक्सपो” भरवावा समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे मार्केट अडीच तीन तासावर आल्याने त्याचा फायदा घेऊन त्या समृद्धी महामार्गालगत उपअधिक वसा स्थापन करावी इथला माल मुंबईच्या मार्केट जाऊ लागला तर बाजारपेठ फुलायला वेळ लागणार नाही कोपरगावची बाजारपेठ संपली असे आपण म्हणतो स्व. शंकरराव कोल्हे यांनी औद्योगिक वसाहत स्थापन केल्यामुळे आज ठोळे, भन्साळी, अग्रवाल, होन यासारखे मोठमोठे उद्योजक येथे आपले व्यवसाय करीत आहे अन्यथा ते पुण्या मुंबईत गेले असते असेही काका कोयटे शेवटी म्हणाले,
यावेळी व्हाईस चेअरमन केशवराव भवर, काका कोयटे, राजेंद्र शिंदे, मनोजशेठ अग्रवाल, रोहित वाघ, प्रशांत होन, सागर शहा, पंडित भारुड, संजय जगदाळे, पप्पूशेठ सारडा, अभिजीत राहतेकर, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, मुनीषशेठ ठोळे आदिसह सर्व संचालक कारखानदार उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण ठाकरे यांनी तर शेवटी आभार रोहित वाघ यांनी मानले.
Post Views:
31