सत्ता येते आणि जाते गेलेली सत्ता परत येणार आहे आपण ती खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
Power comes and goes, power will come back, we will bring it back and I will give you justice Uddhav Thackeray’s promise
हे सरकार गेल्यात जमा, आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणार, उद्धव ठाकरे
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sun15, Sep 19.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :आपल्याला सत्तेची चिंता नाही, आपल्याला जनतेच्या आयुष्याची चिंता आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबियांची चिता आहे. सत्ता येते आणि जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार आणि आपण खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोपरगाव येथील जुनी पेन्शन महाअधिवेशनात राज्यभरातून जमलेल्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती आणि मिंध्यांवर जबरदस्त प्रहार केले. ज्यांनी विश्वासघात केला, आईसारख्या शिवसेनेवर वार केले, त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार , असा सवाल करत आता हे विश्वासघताकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. ही बदलाची ताकद तुमच्यात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू करण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आता हे सरकार गेल्यात जमा आहे. त्यांना पेन्शन कसले त्यांना आता टेन्शन देण्याची वेळ आली आहे. आपण एकजूट राहण्याची गरज आहे. सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्याला एकजूट हेच उत्तर आहे. या एकजुटीमुळे हे सरकार गेल्यात जमा आहे.
पेन्शनच्या मागणीसाठी उपोषण करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनता आधीच उपाशी आहे. त्यामुळे आता उपोषण नको. सत्ताधारी सत्तेशिवाय उपाशी राहायला हवे, असे आपले आंदोलन हवे. अशा आंदोलनाचा निर्धार करा. आंदोलनाची मशाल पेटल्यावर सरकारच्या चमच्यांना त्यावर पाणी ओतायला देऊ नका. जुनी पेन्शन योजना आपल्या सर्वांनी एकत्र येत, आपले सरकार आणत अंमलात आणायची आहे. तुमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे आता आपण सर्व येत आपले सरकार आणा, तुमची मागणी आपण मान्य करतो, हा माझा शब्द आहे, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
मी तुम्हाला जुन्या पेन्शन योजनेचा शब्द दिल्यानंतर आता तुमची ताकद तुमची गर्दी हे मिंधे आणि त्यांचे चमचे टीव्हीवर बघतायेत, निवडणूक येईपर्यंत यांना बहीण माहित नव्हती त्यांनी अचानक लाडकी बहीण योजना आणली आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुनी पेन्शन योजना मान्य केली तुमचं काय होणार आहे तुम्ही त्यांना मत देणार का? कारण अशा गोष्टी होतात निवडणूक आहे दोन महिने मी तुम्हाला आज वचन देतो आपले सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमचे मागणी मान्य करतो ही मागणी मान्य करतो हे मी तुम्हाला वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे कदाचित या कॅबिनेटमध्ये ते मान्य ही करतील ते कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतील. आतापर्यंत ज्यांना बहीण होती, हे आपल्याला माहिती नव्हते, त्यांनी अचानक लाडकी बहीण योजना आणली. तसेच आता ते कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेतील, मात्र एक लक्षात ठेवा असा दगाफटका फक्त तुमच्याशी नाही, महाराष्ट्राशी होण्याची शक्यता आहे. ज्या शिवसेनेने यांना राजकीय जन्म दिला. शिवसेनेने ज्यांना मोठे केले. त्या आईचाच शिवसेनेचा त्यांनी विश्वासघात केला. ज्यांना मी कुटंबातले मानले होते, त्यांनी आपल्याशी विश्वासघात केला, ज्यांनी आईवर वार केला, ते तुमच्यावर वार करणार नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. असे विश्वासघातकी सरकार आपल्याला नको आहे. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न तेव्हाही नव्हते, आताही नाही. माझ्यासाठी मला माझा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील जनता हीच माझी सत्ता हीच माझी ताकद आहे, असेही ते म्हणाले.
राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शन मिळते, ही तफावत तुम्ही पाहिली. सरकार तुम्ही चालवत आहात. कोरोना काळात तुम्ही काम केले म्हणून राज्य वाचले. योजना सरकार जाहीर करते पण ती घराघरांत जाऊन तुम्ही राबवता. तुम्ही साथ दिली नाही, तर कोणतेच सरकार राहू शकत नाही. आता लाडकी बहीण योजना आणली पण भाऊ कोण हेच तिला कळत नाही. प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणत आहेत. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ, असे सध्या सुरू आहे. योजना तुम्ही राबवता मग योजनेवर फोटो कोणाचे असतात. तुम्ही करणाऱ्या कामचे श्रेय हे उपटसुंब घेत आहेत. आपणही शेतकरी कर्जमुक्ती केली, पण त्याचा असा गाजावाजा केला नाही. आपण आपले काम केले. आता फक्त गाजावाजा होत आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
तुम्ही १० टक्के कापले जातात, ते त्यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जात आहेत.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सांगितले की, जुनी पेन्शन योजना ते लागू करणार नाहीत. त्यामुळे राज्यातील सरकारचे चेलेपेले काहीही करू शकत नाही. दिल्लीने डोळे मोठे केले की यांचे काही चालत नाही. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ते विविध योजना आणत आहे. योजना चांगल्या असल्या तरी तिजोरीचा विचार करायला हवा. मात्र, सरकार जनतेच्या पैशांवर योजना जाहीर करत आहेत. त्यामुळे आता त्यांना पेन्शन देऊन टाकू, त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. तुम्ही सरकार चालवू शकतात तसेच सरकार बदलूही शकतात. आता हे सरकार बदलून आपले सरकार आणण्याची वेळ झाली आहे. आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी अंमलात आणणारच, हा माझा शब्द आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आज पलीकडे कोपरगाव शहराच्या ज्या पाच नंबर तळ्याचे जलपूजन होत आहे त्यासाठी आपण अडीच वर्षांपूर्वी १३१ कोटी रुपये मंजूर केले होते. निवडणूक डोळ्यासमोर दिसू लागल्याने आज कोपरगावच्या लोकांना पाणी दिले पाहिजे याची आठवण यांना झाली असल्याची सणसणीत टीका पाच नंबर साठवन तलावाच्या जलपूजनावरून उद्धव ठाकरे यांनी केली. हिजी काही यांची थेरं चालू आहेतना या थेरांना एकदा जाऊ द्या, त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाका, पण घरी बसवा, आता यांना निवृत्त करून घरी पाठवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेवटी केले.
संजय राऊत म्हणाले ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतात ती लढाई आपण जिंकतो देसाई साहेबांनी सर्वांच्या पेन्शनचा हिशोब काढला मलाही किती पेन्शन मिळणार हेही त्यांनी आता मला सांगून टाकले आहे मिलिंद नार्वेकर नवीन आमदार आहात त्यांची पेन्शन सुरू झाली पण आमच्या पेन्शन पेक्षा आम्हाला जे समोर हा जो तमाम मराठी माणूस बसलेला आहे त्याच्या त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात जास्त आहे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते तेव्हा माझ्या मनात आलं हे काय पेन्शनवर जगतात काय तुमची पेन्शन गौतम अदानी कडून येते आमची हक्काची पेन्शन पाहिजे नरेंद्र मोदी यांचा एक नारा होता अच्छे दिन आयेंगे हमको हमारे पुराने दिन आणि पुरानी पेन्शन चाहिये तुमची ही एकजूट अशीच ठेवा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याची शिवसेनेने कायम कामगारांच्या हितासाठी संघर्ष केला लढाई सतत आम्ही कामगारांची लढाई जिंकत आलो म्हणूनच हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट टिकून आहे आपलं सरकार येतंय आपला मुख्यमंत्री होतोय आपल्या मनातील मुख्यमंत्री व्यासपीठावर बसलेला आहे असे उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून म्हणतात उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात घोषणा देत दाद दिली.
यावेळी बोलताना शिवसेना उपनेते सुभाष देसाई म्हणाले दोन कुबड्या घेण्याऐवजी पंतप्रधान घरी बसले असते तर त्यांना देखील बेसिक पेन्शन ४५ हजार व महागाई भत्ता ४५ अशी ९० हजाराचे पेन्शन सुरू झाले नोव्हेंबर नंतर तीन चा काय तीन चाकी असलेले सरकार निवृत्त होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ७० हजार देवा भाऊ यांना ८० हजार तर दादांना ९० हजार पेन्शन मिळणार आहे ती ही आपोआप दर पाच वर्षांनी त्यात वाढ होणार आहे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान यांना पेन्शनचा हक्क असेल तर ५८ वर्ष कर्मचाऱ्याने सेवा केल्यानंतर पेन्शन मागितलं तर त्यात काय चूक असा सवाल शिवसेना उपनेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी कोपरगाव येथे जुनी पेन्शन महाअधिवेशनात बोलताना केला.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रामुख्याने घेतला जाईल जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा आरोप हे सरकार काँग्रेसवर करत आहे मात्र ही योजना भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना बंद झाली आहे हे सरकार आता सत्तेत राहत नाही त्यामुळे आता जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारला ताकद द्या लोकसभेसाठी तुमचे योगदान महत्त्वाचे योगदान आहे आता महाराष्ट्र ते महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले
यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार सुभाष देसाई खासदार संजय राऊत आमदार नार्वेकर खासदार भाऊसाहेब वाघचौरे विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे आदीसहमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,राज्य सचिव गोविंद उगले, राज्य कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी,राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चोथे,राज्य पदाधिकारी रामदास वाघ, शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीम विद्याताई आढाव, संचालक शशिकांत जेजुरकर, मनोज सोनवणे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष नाना गाढवे, किरण निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस शिवनाथ भुजबळ, प्रवीण झावरे, अरविंद थोरात आदीसह राज्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी यास विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.