गणपती बाप्पा मोरया….., पुढच्या वर्षी लवकर या…! दहा दिवसाच्या गणरायाला निरोप

गणपती बाप्पा मोरया….., पुढच्या वर्षी लवकर या..! दहा दिवसाच्या गणरायाला निरोप

Ganapati Bappa Morya….., come early next year..! Farewell to the ten-day Ganaraya

ढोल ताशांच्या गजरात कोपरगावकरांचा गणरायाला निरोप

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Thu18, Sep 11.00 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : मागील १० दिवसापासून शहर व कोपरगावच्या खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर सुरू असलेल्या चैतन्यमय गणेश उत्सवाची सांगता मंगळवारी (दि.१७) रोजी अनंत चतुर्दशीला करण्यात आली. या निमित्ताने गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. जयजयकारात व ढोल ताशाच्या गजरात कोपरगावकरांनी गणरायाला निरोप दिला.

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…असं म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात कोपरगावात सकाळी नऊ वाजता कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला वाजत गाजत  सुरूवात झालीय. तर रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी जय हिंद युवा मंचच्या गणपतीचे शेवटी विसर्जन झाले…

गणेश मंडळाच्या स्वागतासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने येथील अहिंसा चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आले होते

कोपरगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकी आ.आशुतोष काळे व सौ.चैताली काळे यांनी ढोल बजावत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

यावेळी गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक संदेश देत पथनाट्य सादर केले तसेच मुलींवरील वाढलेल्या अत्याचाराबद्दल सामाजिक संदेश व समाजप्रबोधन करणारे मुली महिला आरक्षण करणारे धार्मिक महत्त्व सांगणारे कला गुण दाखवणारे तसेच पौराणिक आश्र शस्त्र मला काम यासारखे देखावे मिरवणुकीत सादर करून कोपरगावकरांची वाहवा मिळवली मिरवणुकीत कोपरगावकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

  आ. आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रत्येक मंडळाचे गणरायाचे पुष्पहार घालून दर्शन घेतले व स्वागत केले.

यावेळी त्यांनी सर्व भक्तांनी आपला उत्साह जपतांना मिरवणूक कायदा व सुव्यस्थेचे काटेकोरपणे पालन करून शांततेत गणेश विसर्जन पार पाडावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले होते. कोपरगाव येथील अनेक मंडळांनी आज उत्तम मिरवणुका काढून महाराष्ट्रात  जिथे जिथे उत्तम मिरवणूक होतात त्यात कोपरगाव चे नाव सामील करून उंचावले असल्याचे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

 नियोजनबद्ध विसर्जन मिरवणूक पार पडल्यामुळे शहरातील नागरिक व सर्वपक्षीय राजकीय नेते कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले यावर्षी सोमवारी व मंगळवारी अशा दोन दिवसात मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या यावेळी अनेक मंडळात महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग होता यावर्षी जवळपास छोटे-मोठे मिळून २०० विविध गणेश मंडळांनी  विसर्जन मिरवणुकी सहभाग नोंदवला होता. विविध कोलागुणांनी व देखाव्यांनी शहरातील नागरिकांची मने जिंकली लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील  अबालवृद्ध, महिला, भगिनी गणरायाला निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने चौक बंदोबस्त तयार करण्यात आला होता मिरवणुका शांततेत पार पडल्या शिर्डी उपविभागीय अधिकारी शिरीष वमने मुख्याधिकारी सुहास जगताप तहसीलदार महेश सावंत शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे माजी नगराध्यक्ष नगरसेवक मंडळाचे स्वागत करीत होते विसर्जन मिरवणुकी त विविध राजकीय पक्षांनी सर्व गणेश  मंडळाचे स्वागत केले.

चौकट

गोदावरी नदीपात्रात ८०० क्यूसेक्स पाणी होते त्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी पाणी साठल्याचे दिसून आले जायकवाडी धरणात सुमारे २० टीएमसी पेक्षा जास्त पाणी वाहून गेले तर गणपती विसर्जनाला पाणी नव्हते अशी स्थिती या वेळेस पाहायला मिळाली त्यामुळे जिथे मोठमोठे खड्डे आहे तिथे गणपती विसर्जन करण्यात आले काही मंडळांनी थेट कुंभारी संवत्सर कोकमठाण आदि ठिकाणी जाऊन गणपती विसर्जन केले. नगरपालिकेने निर्माण्य संकलन करण्याची व्यवस्था  ठेवली होती

 

Leave a Reply

You cannot copy content of this page