कोपरगावातील नवश्या गणपती परिसरात दुपारी गोळीबार; एक जखमी
Afternoon firing in Navashya Ganapati area of Kopargaon; one injured
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Thu18, Sep 18.00 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरातील गजबजलेल्या भागांपैकी एक असणाऱ्या स्वामी समर्थ केंद्र कमानी समोर नवश्या गणपती परिसरात गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवश्या गणपतीपरिसरात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. स्विफ्ट डिझायर मधून चाललेल्या एका तरुणावर हल्लेखोरांनी हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात तनवीर हमीफ रंगरेज (वय ३६) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले आहे. साधारण सहा गोळ्या फायर केल्याचे समजते कारण त्यात दोन जिवंत काडतूस असून बाकीच्या पुंगळ्या सापडल्याचे कळते. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे.
शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांचा पोलीस फौज फाटा घटनास्थळी तातडीने दाखल झाला आहे, घटनास्थळावरून स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच ४२ के १४६१ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. स्विफ्ट डिझायरच्या गोळीबारात दोन बाजूच्या काचा फुटले आहेत. हल्लेखोरांनी सहा राऊंड केल्याची माहिती आहे, घटनास्थळावरून पाच काडतुसे पोलिसांना मिळून आले आहेत. .
स्वामी समर्थ मंदिर नवशा गणपती परिसर या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असून. या रस्त्यावर सोमैय्या कॉलेज असून ही वेळ कॉलेज सुटण्याची असते काही अंतरावरच कोपरगाव शहर पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.