दोन कैद्याचा पोलीस फौजदारावर प्राणघातक हल्ला; कोपरगाव उपकारागृहातील घटना
Two prisoners assault police officer; Incidents in Kopargaon Sub Jail
पोलिसांची सतर्कता कैद्यांचा पळून जाण्याचा प्लॅन फसला
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!For 20, Sep 20.01 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगांव : एखाद्या सिनेमात शोभावा असा थरार कोपरगाव उपकारागृहात घडला आहे. बरॅक एक नंबर ३ मधील दोन कैदी एका कैद्याला मारहाण करीत होते. सदर कैद्याला बरॅकमधुन बाहेर काढण्यासाठी गेलेल्या सहाय्यक फौजदारावर दोन्ही कैद्यांनी पळून जाण्याच्या हिशोबाने हल्ला चढवून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी शहर कोपरगाव शहर पोलिसात दोन कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तहसिल कार्यालयानजिकअसलेल्या दुय्यम कारागृहात सहाय्यक फौजदार यशवंत भिमराव पांडे (वय ५१) नोकरी शहर पोलीस स्टेशन यांना शासकिय कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ करुन लाथबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी किरण अर्जुन आजबे रा.झोडगे मळा नागरदेवळे भिंगार जि.अहमदनगर व मयुर उर्फ भर्या अनिल गायकवाड रा.गांधीनगर कोपरगांव यांचे विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि २०) सप्टेंबर रोजी फिर्यादी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांना सकाळी ८ वाजता ते २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. दरम्यान तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या दुय्यम कारागृह येथे डयुटी नेमलेली असतांना त्यांचे सोबत गार्ड अंमलदार सहा.फौजदार संदिपान गायकवाड नेम.शिर्डी पो.ठाणे, पो.हे कॉ सगळगिळे नेम.राहाता पो.ठाणे,पो.कॉ. गुंजाळ नेम. कोपरगांव तालुका पो.ठाणे असे सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास आरोपी बरॅक नं.३ मधील आरोपी किरण अर्जुन आजबे रा.झोडगे मळा नागरदेवळे भिंगार जि.अहमदनगर व मयुर उर्फ भर्या अनिल गायकवाड रा.गांधीनगर कोपरगांव हे आरोपी दिपक आत्माराम निंबाळकर याला लॉकपमध्ये मारहाण करीत असल्याचे पाहुन तेथे गार्ड ड्युटीवर असलेले सहा. फौजदार यशवंत पांडे यांनी निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते यांना कळवले त्यांनी आरोपीला दुसर्या बरॅकीत नेण्यासाठी बाहेर काढतांना कारागृहातील इतर ७ ते १० आरोपी पळून जाण्याचे हिशोबाने अचानक दरवाजा लोटून पोलिसांवर चालून आले पोलिसांनी मोठ्यात धाडसाने सर्व कैद्यांना रोखले दुय्यम कारागृहाचा भक्कम दरवाजा व पोलिसांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे त्या कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
आरोपी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादी सहाय्यक फौजदार पांडे यांना शिवीगाळ मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.