गँगवॉर! समोरच्या टोळीतील गुंडावर पिस्तूलमधून झाडली गोळी; आठ गुंडांना अटक: पाच दिवसाची पोलीस कोठडी
Gangwar! A pistol shot at a goon in the front gang; Eight gangsters arrested: five days in police custody
दोन्ही गॅंगकडूनपरस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!For 20, Sep 20.11 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव दोन प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांच्या गोळीबारात समोरच्या टोळीतील गुंडावर गोळीबार केला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना कोपरगाव शहरातील नवशा गणपतीसमोर गुरुवारी (दि.१९) घडली आहे. दोन टोळ्यात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद केली असून आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे न्यायालयाने आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तर एक जखमी आरोपी नाशिक येथे उपचार घेत आहे. तर दुसरा एक जण फरार आहे. अशी माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने यांनी पत्रकारांना दिली.
कोपरगावातील एका गुंडावर प्रतिस्पर्धी टोळीकडून काही दिवसापूर्वी रस्त्यात गाठून गाठून पिस्तल दाखवत धमकी दिली होती.
याबाबत पहिली फिर्यादी नाजिम इस्लाउद्दीन शेख (वय २६) रा.झेंडा गल्ली गांधीनगर कोपरगांव याने आरोपी तनवीर रंगरेज रा.सुभाषनगर,दादा मोरे रा.राहाता, रवी बनसोडे रा.शिर्डी, अमर भोसले रा.लोणी, बाळु पगारे रा.शिंगवे ता.राहाता, शहारुख शेख रा.श्रीरामपूर यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी व साक्षीदार हे त्यांची इनोव्हा गाडी क्र एमएच ०४ जीझेड ५७५८ हिने कोपरगांवकडून गोदावरी नदीचे छोटे पुलाकडे जात असतांना आरोपी यांनी त्यांची स्विफ्ट डिझायर क्र एमएच ४२ के १४६१ हिने त्यांच्या पाठीमागून पुढे जावून इनोव्हा गाडीला आडवी लावून दादा मोरे याने त्याच्या हातातील गावठी कट्टा काढून त्यातून फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद दिली आहे.
तर दुसर्या परस्पर विरोधी फिर्यादीत रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे (वय३१) रा.पिंपळवाडी रोड राहाता याने दिली असून त्यात नाजिम शेख,एजाज मनियार, सागर मंजुळ,अझहर शेख, सर्व रा. कोपरगांव यांनी फिर्यादी व साक्षीदार हे त्यांचे स्विफ्ट गाडी क्र एमएच ४२ के १४६१ कोपरगांव कडून गोदावरी नदीचे पुलाकडे जात असतांना त्यांची इनोव्हा गाडी क्र एमएच ०४ जीझेड ५७५८ पाठीमागून पुढे जावून स्विफ्ट डिझायरला आडवी लावून त्यांना शिवीगाळ करुन त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी नाजिम शेख याने हातातील गावठी कट्टा काढून त्यातून फिर्यादीच्या अंगावर गोळया झाडून त्याच्या छातीत व कमरेस दुखापत करुन जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार दहा गुंडांवर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट,आर्म अॅक्ट, भारतीय न्याय संहिता कलमाखाली एकमेका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अटक आरोपींची नावे-नाझीम इस्लाउद्दीन शेख,एजाज अन्सार मणियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजुळ,अझर इस्लाउद्दीन शेख,दूसरा गट- अटक आरोपी दादा मोरे,रवी बनसोडे,बाळू पगारे,अमर भोसले प्रकरणी आठ जणांना अटक केली.तर गोळीबारात जखमी झालेल्या तनवीर या गुंडावर उपचार सुरू आहेत शाहरुख शेख हा फरार आहे अशी माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान या आठ आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना (दि.२४ सप्टेंबर) पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.
या सर्व घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे तपास करीत आहेत.
दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा पोलीसांनी केला असून डॉग युनिट स्क्वॉड तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. अशी माहिती शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी वमने यांनी देवून गेल्या ७-८ महिन्यापासून वरील टोळयांमध्ये कुरबुरी हाणामार्या सुरु आहेत त्यातून असे वाद उफाळले आहे. या घटनेला नाजुक किनार असल्याची साशंकता त्यांनी व्यक्त केली