राजाश्रयामुळे गुन्हेगारी पोचली भरवस्तीत- विवेक कोल्हे

राजाश्रयामुळे गुन्हेगारी पोचली भरवस्तीत- विवेक कोल्हे

Because of Rajashraya, crime has reached trust- Vivek Kolhe

स्व. शंकरराव कोल्हे व स्व. शंकरराव काळे यांनी जपलेल्या  गावपण संस्कृतीचे  विद्रूपीकरण झाले

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!For 20, Sep 21.11 Am.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  गेल्या वर्षभरात गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व आणि अंतर्गत वैमनस्यातून रिवाल्वर लावणे गोळीबार करणे अशा  घटना घडल्या आहेत. राजाश्रयामुळे शहराच्या वेशीवर असणारी गुन्हेगारी आज भरवस्तीत येऊन ठेपली असल्याचा घणाघाती आरोप  कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी थेट पोलीस स्टेशन येथे निवेदन देताना केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप शिवसेना रिपाई मनसे या पक्षांच्या पदाधिकाऱ्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगावात गुंडाराज सुरू आहे. तनवीर रंगरेज याच्यावर  गोळ्या झाडणारा आरोपी याने गुन्हा करण्यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते अल्ला झालेल्या युवकाने आमदार आणि त्यांचे स्वीय सहायक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडिओ दाखवत दुसऱ्याला गाडण्याची भाषा करणाऱ्या  आमदाराने कायदा आणि सुव्यवस्था गाडून टाकली असल्याचा हल्लाबोल करताना कोपरगावात सत्ताधारी नेत्याची आणि गुंडाची जवळीक वाढली असल्याची जोरदार टीका विवेक कोल्हे यांनी  केली

१९ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरात पोलीस स्टेशनच्या नजीकच्या अंतरावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.अशा गंभीर परिस्थितीत गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याने हे प्रकार वाढले असल्याचे समोर येत  असे कोल्हे यांनी म्हटले आहे 

यावेळी  विवेक कोल्हे यांनी प्रशासनाला जाब विचारत या काही वर्षात झालेल्या घटनांचे दाखले दिले.चक्री,बिंगो,बेकायदा रेशन,बाजार ओट्यावरील गांजा खडकी येथील अवैध शस्त्र कारखाना,महापुरुषांचे नाव घेऊन किंवा जातीवाचक शिवीगाळ करून वातावरण दूषित करणारे वाळूतस्कर आमदारांचे कार्यकर्ते आहेत हे समोर येते आहे. दोन वेळा मुस्लिम समाज धर्मग्रंथ विटंबना,धर्म कोणताही असो त्या धर्मगुरुला मारहाण होणे, समाजा समाजात तेढ निर्माण करणे.अनेक ठिकाणी रेशन विक्री सारख्या प्रकारात त्यांचे निकटवर्तीय आहेत.खडकी येथे शस्त्र कारखाना कुणाच्या जागेत होता त्यांवर काय कारवाई झाली ? दर्शना पवार या एम पी एस सी उत्तीर्ण युवतीच्या खून प्रकरणी राज्यातील इतर आमदारांनी आवाज उठवला मात्र आमचे  आ.काळे मात्र त्यात मौन राहिले ही शोकांतिका असून त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे यांनी जपलेल्या गावपण  संस्कृतीचे विद्रूपीकरण केले 

यावेळी जितेंद्र रणशुर यांनी तीव्र शब्दात प्रशासन आणि आमदार काळे यांचा निषेध केला.सुरेगाव येथे जातीवाचक बोलल्याने वाद झाले त्यात कुणाचा कार्यकर्ता होता हे समोर आले आहे. राजरोस अवैध धंदे सुरू असून अधिकारी देखील या गुन्हेगारांचे बळी ठरता आहेत,कित्येक शालेय विद्यार्थी व्यसनाकडे  व्यवसायांना अभय कुणाचे आहे असे कैलास जाधव म्हणाले.पराग संधान यांनी विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात तहसील येथे अठरा महिने सातत्याने रेशन घोटाळ्यावर आवाज उठवला आहे वाढती गुन्हेगारी रोखून मुख्य गुन्हेगारीला बळ देणारे सहआरोपी करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.राजेंद्र सोनवणे यांनीही आमदार काळे यांच्यावर व त्यांच्या स्विय्य सहाय्यकाचे नाव हल्ला झालेल्या युवकाने घेतल्याचे विषद केले व प्रशासनाने दबावात काम करू नये अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असे स्पष्ट केले.विनोद राक्षे यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे त्यामुळे आमचे पदाधिकारी असे गैरप्रकार करत नाही.जनसामान्यांना बाहेर उभे रहावे लागते व गुन्हेगार राजाश्रय घेऊन आरामात मद्ये बसतात हे दुर्दैव आहे.सुखदेव जाधव यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांनी ज्या प्रमाणे शहराला जपले तसे अशा भीषण स्थितीत युवानेते विवेक कोल्हे यांनी आवाज उठवला आहे.

केशवराव भवर,रवींद्र पाठक,विजय आढाव, बबलू वाणी,सिद्धार्थ साठे,अविनाश पाठक, सागर जाधव,सतीश काकडे,राजेंद्र बागुल, बापू पवार,अशोक लकारे,गोपीनाथ गायकवाड, दीपक जपे,वैभव गिरमे,अल्ताफ कुरेशी,रंजन जाधव,पप्पू पडियार,सुखदेव जाधव, सद्दामभाई सय्यद,खालीकभाई कुरेशी,फकीर महंमद पहिलवान,विनोद नाईकवाडे,प्रमोद नरोडे,सोमनाथ म्हस्के, रामचंद्र साळुंखे,किरण आव्हाड, सतीश रानोडे, विजय चव्हाणके, विक्रांत सोनवणे, सचिन सावंत, रवींद्र लचूरे,सिद्धांत सोनवणे, प्रसाद आढाव,रोहित कनगरे,शरद त्रिभुवन, दत्ता कोळपकर,रुपेश सिनगर, संतोष साबळे, शंकर बिऱ्हाडे, गोटू पगारे, अनिल जाधव, राजेंद्र डागा, रहीमभाई शेख,विष्णू गायकवाड, सिद्धार्थ पाटणकर, कुणाल लोणारी, इलियास खाटीक,पप्पू जोशी,अहमद बेकरीवाले, शुभम भावसार, अजय शार्दुल,चंद्रकांत वाघमारे, संजय खरोटे,सुनील राका,मुकुंद उदावंत, स्वप्निल कडू, मुक्तार शेख,अर्जुन मोरे,प्रभुदास पाखरे,रोहन दरपेल,गणेश शेजवळ,अमोल बागुल,लखन मस्के आदिसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page