तो इतिहास पुसला जाणार; आजपासून तीन दिवसाआड पाणी – सतीश कृष्णानी
That history will be erased; Water every three days from today -Satish Krishnani
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat 21, Sep 20.01 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठरल्याप्रमाणे रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे कोपरगावच्या नावावर असलेला काळा इतिहास देखील पुसला जाणार असल्याचे ज्येष्ठ व्यापारी सतीश कृष्णानी यांनी म्हटले आहे.
पाणी टंचाई काळात कोपरगावच्या नागरिकांना नळाला चार दिवसांनी, आठ दिवसांनी पाणी काही वेळेस तर महिनाभराने पाणी हे कोपरगावच्या पाचवीलाच पुंजले होते. त्याचा कोपरगाव शहरातील नागरिकांनी व विशेषत: महिलांनी ज्यांचे पाण्याशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही त्यांनी किती त्रास सहन केला असेल याची कल्पना न केलेलीच बरे. त्यामुळे कोपरगावच्या बाजार पेठेवर झालेले दूरगामी परिणाम व बाजारपेठेतील आर्थिक मंदी हे चिंतेचे विषय झाले होते.
आ.आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी करून कोपरगावच्या नागरिकांना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासित केले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करून १३१.२४ कोटी निधी आणून ५ नं.साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून वितरण व्यवस्थेचे काम देखील अंतिम टप्यात आहे.
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याने कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे कृष्णानी यांनी म्हटले आहे.