आमदार साहेब कोटीच्या विमानातून खाली उतरा – भाऊसाहेब सोनवणे
Get down from MLA Saheb Koti’s plane – Bhausaheb Sonwane
साडेआठ कोटीच्या थकबाकीमुळे काकडीचा विकास थांबला
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat 21, Sep 20.11 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: काकडी विमानतळाला निधी शासनाचा, कामे विमान प्राधिकरणाची मग कवडीचेही योगदान नसताना तरीही काकडी विमानतळासाठी शेकडो कोटी निधी आणला अशी प्रसिद्धी करणाऱ्या आ. आशुतोष काळेंनी कोटीच्याविमानातून खाली उतरून साडेआठ कोटीच्या थकबाकीमुळे काकडी गावचा विकास थांबल्याने गावातील रस्त्याची झालेली दुरावस्था पहावी असे आवाहनकाकडी गावचे उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानेप्रोटोकॉल म्हणून विमान प्रशासनाने दिलेल्यासन्मानाचा फायदा घेऊन मीच निधी आणला असा गैरसमज पसरवण्याचे काम आ. आशुतोष काळे करीत आहेत मात्र हे करीत असताना आपल्या मतदारसंघातील काकडी ग्रामपंचायतीचे विमानप्राधिकरणाकडे आठ कोटी ३० लाख रुपये थकलेले आहेत त्यामुळे काकडी गावाचा विकास थांबला आहे गावकरी मूलभूत गरजा पासून वंचित आहेत दुर्दैवाने आमदार साहेबांना काकडी हे गाव कोपरगाव मतदार संघात आहे याचा त्यांना विसर पडला की काय अशी खोचक टिका सोनवणे यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे
काकडी हे विमानतळ जागतिक कीर्तीच्या साई भक्तांसाठी शासनाने निर्माण केले आहे त्यामुळे या विमानतळाच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे त्या निधीचे श्रेय घेणे हास्यास्पद असून शेकडो कोटी विमानतळासाठी आणल्याचे बॅनर लागले जातात मुळात आमदार काळे हे केवळ फोटो काढण्यासाठीच विमानतळावर येतात अशी टीकाही सोनवणे यांनी पत्रकातून केली आहे
ज्या गावाने जमिनी दिल्या,सर्व प्रकारचे सहकार्य शासनाला केले त्यामुळे विमानतळ झाले. या काकडी ग्रामपंचायतचे विमान प्राधिकरणाने साडेआठ कोटी रुपये थकवले याकडे मात्र लक्ष देण्यास श्रेय घेणाऱ्या आमदारांना वेळ नाही या गावातील जनता विमानाने फिरत नाही ज्या रस्त्याने प्रवास करते त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तेव्हा आपले शेकडो कोटीचे विमान जमिनीवर आणून एकदा सत्य परिस्थिती पहा या आवाहनाचा पुनरुच्चार सोनवणे यांनी शेवटी केला आहे.
Post Views:
76