बदनामी केल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – आ. आशुतोष काळे
Defamation will be sued for damages – A. Ashutosh Kale
नगरपालिकेला दिलेल्या निधीचे कामाचे ऑडिट करणार का ?
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Mon 23, Sep 19.11 Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: गोळीबार प्रकरणातील जखमी आरोपीच्या व्हिडिओ क्लिपवरून युवा नेते विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार आशुतोष काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता बदनामी कराल तर दावा ठोकला जाईल असा सज्जड इशारा सोमवारी (२३) रोजी साई तपोभूमी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला.
१९ सप्टेंबर रोजी वर्दळीच्या ठिकाणी दुपारी साडेचार वाजता झालेल्या गोळीबार संदर्भात पोलिसांना निवेदन देताना विवेक कोल्हे यांनी कोपरगावात गुंडाराज सुरू आहे जखमी आरोपीने आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडिओ दाखवत दुसऱ्याला गाडून टाकण्याची भाषा करणाऱ्या आमदाराने कायदा आणि सुव्यवस्था गाडून टाकल्याचा हल्लाबोल केला कोपरगावात रेशन तस्करी, वाळू तस्करी, अवैध धंदे, धर्मग्रंथ विटंबना, धर्मगुरूला मारहाण, शस्त्र कारखाना, आदी प्रकरणात त्यांचे निकटवर्तीयअसल्याचा आरोप करून सत्ताधारी नेत्याची आणि गुंडाची जवळीक वाढल्याची जोरदार टीका विवेक कोल्हे यांनी शहर पोलीस स्टेशनला निवेदन देताना केली होती.
यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया देताना आ. आशुतोष काळे म्हणाले, एक तर मी केलेल्या, होत असलेल्या आणि होणार असलेल्या विकास कामामुळे बोलायचे कशावर ? यामुळे विरोधकांकडून गोळीबार प्रकरणाच्या अडून माझी बदनामी करण्याचे उद्योग सुरू आहेत. ज्याने चुकीचे काम केले त्याला माफी नाही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे मी लोकप्रतिनिधी आहे कोणीही माझ्यासोबत फोटो काढून त्यावर जर काही टॅग लाईन टाकत असेल तर तो जनतेचा अधिकार आहे त्याला मी थांबवू शकत नाही पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईलच कायदा सर्वांना सारखाच आहे यात राजकारण आणू नये असे मुद्दे आणून केवळ बदनामी करायचे निवडणुका म्हटले की अशा गोष्टी होणारच यावर मात्र लोकांनी विचार करायचा आहे असे ते म्हणाले, तुम्ही दिलेल्या संधीतून मी कामे केली रस्ते, इमारती, वीज, पाणी कामे केली. काही झाली, काही सुरू आहेत, काही होणार आहेत अजून बरेच प्रश्न आहेत विरोधकांनी यावर चर्चा करावी जाती-धर्माच्या नावाखाली केवळ द्वेष पसरवले जातील म्हणून स्पर्धा करायची तर कारखाने काढा, हजारो लोकांना रोजगार द्या, लोक तुमचे काम करतील असा टोला लगावत दिशाभूल करून काहीही साध्य होणार नाही, यापुढे बदनामी कराल तर दावा ठोकला जाईल असा सज्जड दमच आमदार आशुतोष काळे यांनी नाव न घेता विवेक कोल्हे यांना दिला.
अवैध धंदे आणि गोळीबार या प्रकरणांत विरोधकांकडून केवळ राजकीय आरोप होतो आहे. म्हणून आपल्याला हात झटकता येणार नाही ? आमदार या नात्याने आपल्याला या प्रश्नासह अवैध धंदे, वाळू तस्करी, रेशन तस्करी यात जातीने लक्ष घालावेच लागेल? असे कार्यकर्ते असतील तर त्यांना राजाश्रय न देता बाजूला करा या प्रश्नावर बोलतांना गुन्हेगार कोणीही असो चुकीला माफी नाही कारवाई झालीच पाहिजे असे आ. आशुतोष काळे म्हणाले मी यात जातीने लक्ष घालतो. नगरपालिकेला एवढा निधी दिला
म्हणतात मग त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला आहे का ? प्रत्येक रुपयाचा हिशोब घेणार का? कामाचे व निधीची ऑडिट करणार का? आचारसंहितेच्या आत पालिकेत या प्रश्नावर आढावा बैठक घेणार का ? त्यावर त्यांनी आढावा बैठक घेऊ असे सांगितले. आमदार निधीतून झालेल्या रस्त्यांची दुर्दशेबाबत पत्रकारांनी आमदार काळे यांच्या निदर्शनास आणून देताना निकृष्ट कामाबद्दल ठेकेदारावरील कारवाई बाबत आपली काय भूमिका आहे? त्यावर त्यांनी चौकशी करतो असे उत्तर दिले.
गोळीबार प्रकरण व अवैध धंद्यावरून आता आरोप प्रत्यारोप कोपरगाव चे राजकारण चांगलेच पेटले आहे.
पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते
चौकट
विविध कामासाठी नगरपालिकेला ३५० कोटी रुपये मंजूर केले. कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे चालू आहेत, काही चालू होणार आहेत. भुयारी गटारीसाठी ३२३ कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे विकास होत आहे- आ. आशुतोष काळे
Post Views:
56