कोपरगावच्या २५ हजार तरुणांना बेरोजगारीच्या उंबरठ्यावर नेण्याचे पाप कुणाचे? विवेक कोल्हे 

कोपरगावच्या २५ हजार तरुणांना बेरोजगारीच्या उंबरठ्यावर नेण्याचे पाप कुणाचे? विवेक कोल्हे 

Whose sin is it to take 25 thousand youth of Kopargaon to the brink of unemployment? Vivek Kolhe 

 डॉ. आंबेडकर मैदानावर या विवेक कोल्हे यांचे आमदार काळे यांना चर्चेचे थेट आव्हान

कोपरगाव : समृद्धीमहामार्गाबरोबरच कोपरगाव तालुक्यात येऊ घातलेली  ‘स्मार्ट सिटी” घालवून कोपरगावच्या २५ हजार तरुणांना बेरोजगारीच्या उंबरठ्यावर नेण्याचे महापाप कुणाचे ? असा सवाल करून त्यांना विकास आणि रोजगारीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशा शब्दात औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर मंगळवारी(२४) रोजी समाजमाध्यमासमोर शरसंधान  साधले. 

  विवेक कोल्हे पुढे म्हणाले,समन्यायी पाणी वाटप कायदा प्रसंगी मौन हे तात्कालीन राजकर्त्याच्या नाकर्तेपणाचे पाप ,पाच नंबर साठवण तलावाने धुता येणार नाही अशी जोरदार टीका केली.

गेल्या पंधरा-वीस वर्षात एकही रोजगार कोपरगाव तालुक्यात आला नाही जेंव्हा जेंव्हा एखादा उद्योग तालुक्यात सुरू करण्याची वेळ येते तेंव्हा तेंव्हा पाण्याच्या नावाखाली उद्योगांना परवानगी नाकारली जाते. वीस वर्षात कोपरगाव तालुक्याचे पाणी गेले आणि रोजगाराची परिस्थिती गंभीर झाली या वीस वर्षात १५ वर्ष सत्ता काळे घराण्याकडे आहे पाच वर्षात तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाहण्यासाठी मोठा लढा दिला होता. ते पाणी मिळवण्यात अपयश कशामुळे आले हे सर्वश्रुत आहे. असा हल्लाबोल विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
विवेक कोल्हे पुढे म्हणाले माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आपल्या तीस-पस्तीस वर्षाच्या सत्ता काळात सातत्याने पाणी संघर्ष केला कोपरगाव तालुक्याचा शेतीचा सिंचनाच्या पाण्याचा उद्योगाच्या माध्यमातून रोजगारीचा विचार केला त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागात  साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, दूध संघ, पोल्ट्री, इंजिनिअरिंग कॉलेज, खत कारखाने, अशा जोड प्रकल्पासह नॅशनल हॅवी पुणे, रयत शिक्षण संस्था, एसटी महामंडळ, शिर्डी साई संस्थान यातून माध्यमातूनकोपरगावच्या अर्थकारणाला चालना देण्याचाच प्रयत्न केला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी त्या काळातच दूरदृष्टी ठेवून साठवण तलावासाठी २५ एकर जमीन घेऊन दिली. त्याच जमिनीच्या २२ एकरात आज पाच नंबरचा साठवण तलाव केला म्हणून तुम्ही आपली पाठ थोपटून घेत आहात. यात तुम्हाला इतरांचे योगदान दिसले नाही अशी जोरदार टीका केली.
विवेक कोल्हे  म्हणाले, तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेचे तात्कालीन शिवसेना-भाजप युतीचे नगरसेवक यांनीच पाच नंबर साठवण तलावाचा  ठराव केला होता  पाच नंबर साठवण तलावाच्या तांत्रिक मंजुरीचे साडेसात लाख रुपये देखील स्नेहलता कोल्हे यांच्या काळात  तात्कालीन नगराध्यक्ष ऐश्वर्या  सातभाई यांनी भरले आहेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे बिपीन कोल्हे यांनी केंद्र सरकारकडून ४८ कोटीची पाणी योजना आणली होती.  कोल्हे परिवाराने सातत्याने कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी आपले योगदान वेळोवेळी दिलेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या शेती सिंचनासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुकणे, भाम, भावली, वालदेवी, कश्यपी या धरणांना चालना  दिलेली आहे पाण्यासाठी खडा आंदोलन असेल किंवा जलसमाधी  आंदोलने  उभी केली होती. एक्सप्रेस कॅनॉलचे पाणी अडवण्याचे सुद्धा काम स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेले आहे. पाण्यासाठी काळे परिवाराने संघर्ष केल्याचे कुठेही ऐकवित नाही असा टोला देखील विवेक कोल्हे यांनी यावेळी लागवला.
उलट आमदार अशोक काळे यांच्या काळात समन्यायी कायदा होऊन  पाणी गेले तालुक्याच्या पाण्याचे वाटोळे झाले असा आरोप देखील विवेक कोल्हे यांनी यावेळी केला
बिपिन कोल्हे यांनी  वॉटर लेस इंडस्ट्रीज शिवाय पर्याय नाही अशी वेळ आली त्यावेळेस संजीवनी येथे कॉल सेंटर सुरू करून हजारो तरुणांना रोजगारी दिले इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार दिला औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना व उद्योगांना प्राधान्य देत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला 

अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात असा आरोप तुमच्यावर होत आहे ?

यावर तुमचे काय म्हणणे आहे यावर विवेक कोल्हे म्हणाले गोळीबारातील आरोपी नाजीम शेख हा तुमच्या दहीहंडीचा कार्याध्यक्ष होता हे सगळ्या कोपरगावकरांनी पाहिले राजकीय स्वार्थापोटी गुन्हेगार प्रवृत्तीला राजाश्रय देऊन  आमच्यावर दावा ठोकण्याची भाषा करता आता जनताच तुमच्यावर दावा ठोकणार आहे.   गेल्या पाच वर्षात कोपरगाव तालुक्यात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे ५५ गुन्हे यासह ४०  बलात्काराचे,  ८० विनयभंगाचे, २५० दरोडे चोऱ्या घरपोळ्या चोरी १००० च्या वर घरफोड्या प्रशासनाच्या संगणमतामुळे वाळूचे अवघे ४० ते ५० गुन्हेच दाखल आहेत ही आश्चर्याची बाब आहे, घरफोडी ३०० या व्यतिरिक्त कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैध धंदे, अपघात, हुंडाबळी याचा याचा पाढाच वाचून  मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी तालुक्यातील गुन्हेगारी बाबत सपशेल फेल गेले असल्याचा आरोप  विवेक कोल्हे यांनी केला

आ. आशुतोष काळे यांनी आपल्याला  विकासावर बोलण्याचे आवाहन केले आहे यावर आपण काय म्हणता ? 

यावर बोलताना विवेक कोल्हे म्हणाले ३००० कोटीच्या वल्गणा म्हणजे खोटेपणाचा कळस आहे. आम्हाला विकासावर बोलण्याचे आव्हान देता हिम्मत असेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर या समोरासमोर बसून विकासाच्या गप्पा करू आणि हिशोब घेऊ  असे उत्तर दिले

शहरातील रस्ते रस्त्यांची दुर्दशा झाली यावर आपण काय म्हणाल ?

विवेक कोल्हे म्हणाले, टक्केवारी   फोफावल्यामुळे  दोन महिन्यात रस्ते उखडले  “टक्केवारी द्या, कामे करा” हे सूत्र ठरलेले आहे. विशेष म्हणजे जी कामे केली नाही ती सुद्धा स्वतःच्या नावावर खपवली जात आहेत. यांच्या  स्वीय सहाय्यकाचा कोट्यावधीचा बंगला होतोय असे ऐकवीत येते. हे म्हणजे अक्षरशः भ्रष्टाचार बोकळला  असे म्हणता येईल.

शहरातील अवैध धंद्याबाबत आपण काय म्हणू शकता ?

यावर विवेक कोल्हे म्हणाले,राजरोस गुन्हेगारी वाढत आहे. प्रशासनावर  लोकप्रतिनिधीचा वचक राहिलेला नाही रेशन दुकान चा भ्रष्टाचार पाच नंबर साठवण तलावाची लांबी रुंदी खोली मोजून पहावी लागेल हे पितळ उघडे पडेल म्हणून घाई घाईत  पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन उरकण्यात आले असल्याचा आरोपही कोल्हे यांनी केला.

 पाचनंबर तलावाला तुम्ही आडवे आले असा आरोप आमदारांनी केला ? 

यावर विवेक कोल्हे म्हणाले, आम्ही आडवे येण्याचा प्रश्न नाही,  ठराव आम्ही केले जमिनी आमच्या आजोबांनी घेऊन दिल्या, त्या जमिनीधारकांना संजीवनी कारखान्यात नोक-या आम्ही दिल्या  असे उत्तर दिले
पत्रकार परिषदेला  किरण रहाणे दीपक पवार अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान योगेश इंगळे आदी उपस्थित होते. 

चौकट 

पाच नंबर तलाव झाला म्हणजे सर्व काही आलबेल झाले असे नाही यात अनेक त्रुटी आहेत त्या तपासाव्या लागतील कोपरगावकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदाराकडे प्रामाणिक हेतू आणि दूरदृष्टी असती तर २०० कोटी रुपये निधीतून नांदूरमदमेश्वर बंधाऱ्यातून  थेट बंद पाइपातून कोपरगावसाठी पाणी आले असते आणि कोपरगावकरांना नियमित स्वच्छ पाणी मिळाले असते  परंतु राजकीय अपरिपक्वता व  बालिश बुद्धी असल्यामुळे अनेक त्रुटी राहून आर्थिक नुकसानच झालेले आहे,आता  ऑडिट करावेच लागेल –  विवेक कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page