पाच वर्षात कोपरगावची वाताहात झाली- विवेक कोल्हे.        

पाच वर्षात कोपरगावची वाताहात झाली- विवेक कोल्हे.

In five years Kopargaon became a disaster – Vivek Kolhe.

कोल्हे कारखान्याची ६२ वी वार्षिक सभा

 Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat 28, Sep 19.40 Pm.By सालकर राजेंद्र 

कोपरगाव: गेल्या पाच वर्षात आपण ३ हजार कोटी रुपये निधी आणल्याचे वक्तव्य आ. आशुतोष काळे यांनी वारंवार केले. या वक्तव्याचा  विवेक कोल्हे यांनी चांगला समाचार घेत आ. आशुतोष काळे यांच्यावर जोरदार टीका केली पाच वर्षात कोपरगाव मतदार संघाची वाताहात होण्याला आ. आशुतोष  काळेच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शनिवारी (दि.२८) कारखान्याच्या ६२ व्या वार्षीक सर्वसाधारण सभेच्या   अध्यक्षपदावरून बोलतांना केला.

विवेक कोल्हे म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताकरीता सतत रस्त्यावर उतरून संघर्ष करत तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पाण्याची निर्मीती करून या भागातील शेतकरी जगविण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या सरकारविरूध्द आंदोलने केली, मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी पोरकटपणांचे आरोप करून त्यांच्या ३५ वर्षाच्या कामाचा हिशोब मागतात, वास्तविक पाहता त्यांचे तेव्हढे वय देखील नाही. एकीकडे तीन हजार कोटीची जाहिरातबाजी केली जाते, पण गेल्या पाच वर्षात कोपरगांवची पुर्णपणे वाताहात झाली आहे.
 प्रारंभी अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद शेतक-यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या हस्ते अहवाल सालात रामदास बोठे करंजी (आडसाली एकरी ८५. ४१६), सौ ताराबाई पोपटराव जुंधारे कोळपेवाडी (पुर्व हंगामी एकरी ८१.४५४), अमित लोणारी संवत्सर (सुरू एकरी ६२.५१३), व रामदास काटवणे घोयेगांव (खोडवा एकरी ८३.८२९) मे. टन सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांसह अन्य ठिकाणी निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यांत आला. विषय पत्रिकेवरील सर्व चौदा विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले. मागील सभेचे अहवाल वाचन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले त्यास सभासदांनी एकमुखांने मंजुरी दिली.
प्रास्तविकांत विवेक कोल्हे यांनी केंद्र शासनाच्या धोरणानुसार कोल्हे कारखान्यांचे इथेनॉलची निर्मीती केली पण त्यात धरसोडीचे धोरणामुळे कारखान्यांस मोठा आर्थीक फटका बसला त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेवुन हा प्रश्न मार्गी लावला त्याचा राज्यातील सर्व कारखान्यांना फायदा झाला. काळाची पावले ओळखुन केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार येत्या दोन महिन्यांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सीएनजी प्रकल्प कार्यान्वीत करेल. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदर्शी धोरणाप्रमाणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने उपग्रहासह, आधुनिकीकरणांची साथ घेत, खुल्या अर्थव्यवस्थेत सातत्यांने नव नविन पावले उचलुन सभासद शेतक-यांच्या विकासासाठी विविध प्रकल्प उभे केले आहे. देशात मधुमेहीं रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता शुगर फ्री साखर निर्मातीच्या सर्व चाचण्या संजीवनीने पुर्ण केल्या असुन लवकरच त्या साखरेचे उत्पादन होईल त्यात आमचा कारखाना देशात आघाडीवर राहिल असे सुतोवाच केले. 
  विवेक कोल्हे यांनी लोकप्रतिनिधींवर घणाघाती आरोप केले. एकीकडे ३ हजार कोटी रूपये आणल्याच्या वल्गना केल्या जातात मात्र तालुक्यातील सर्व गांवे मिळुन हिशोब काढला तर प्रत्येक गावांस सुमारे ३० कोटी रूपयांचा निधी मिळु शकतो पण उपस्थितांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी एक छदामही मिळाला नसल्याचे सांगितले. तालुक्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर व वाढत्या गुन्हेगारीवर तसेच बेरोजगारीवर आपण आवाज उठविला तर आपल्याविरोधांत आता खोटे नाटे आरोप करून पत्रकार परिषदा म्हणून निंदानालस्ती करत आहेत, कोपरगांव शहरासह मतदारसंघाची गेल्या पाच वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभुल केली त्यामुळे जनताच आता त्यांच्यावर फसवणुकीचा दावा ठोकणार आहे. आमचेवर पोरकटपणांचे आरोप करण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर येवुन आरोपाचे खंडन करा, दुध का दुध, पानी का पानी करू, अंगावर आले तर शिंगावर घेवुन प्रत्युत्तर देवु. चालू हंगामात पर्जन्यमान ब-यापैकी झाल्यांने सभासद शेतक-यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करून कार्यक्षेत्रात उत्पादन वाढवावे,उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कधीही मागे नव्हता आणि राहणारही नाही, सभासद शेतक-यांसह सर्वांची दिवाळी गोड करू असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. सुत्रसंचलन संचालक विश्वासराव महाले यांनी केले.
 
चौकट-
आगामी विधानसभेच्या निवडणुकींत कोपरगांवच्या जनतेने आता योग्य निर्णय घेण्यांची वेळ आली आहे., आणि जनता तो निर्णय निश्चितपणे करेल असा विश्वास  विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
चौकट- 
  तुटीच्या गोदावरी खो-यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामाला मंजुरी मिळविली, २००५ मध्ये समन्यायी पाणी वाटपाला तत्कालीन लोकप्रतिनिधींनी मुकसंमती दिली, सध्याच्या सरकारमध्ये सामिल असलेल्यांनी तुटीच्या गोदावरी खो-यात पाणी वाढविण्यांसाठी काय केले असा सवाल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page