कोपरगावमध्ये झालेल्या गोळीबारावर काळे – कोल्हे एकमेकांवर आरोप करत आहेत
Kale – kohle are accusing each other of firing in Kopargaon
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat 28, Sep 19.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : जुन्या वादातून पंधरा दिवसांपूर्वी शनिवारी भर दिवसा कोपरगाव शहरात शहरातील नवश्या गणपती समोर स्विफ्ट कारमधून जात असलेल्या तरुणावर गोळीबाराची घटना घडली, यात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रात्री गोळीबार करणारा आरोपी स्वतःहून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला, वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
नजीम शेख आणि तनवीर रंगरेज यांच्यात गोळीबार झाला. यात रणवीर रंगरेज जखमी झाला आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या गोळीबाराहून शहरातले राजकीय वातावरण तापले आहे गेल्या पंधरा दिवसापासून आ. आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
दोन्ही बाजूंचे म्हणणे आहे की, गोळीबार करणारा आरोपी नजीम शेख हा आ. आशुतोष काळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दहीहंडी कार्यक्रमाचा कार्याध्यक्ष होता. यावरून युवा नेते विवेक कोल्हे यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आ.आशुतोष काळे राजाश्रय देत असल्याचा आरोप थेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देतांना जाहीरपणे करून घेरण्याचा प्रयत्न करून कोंडीत पकडले होते, यावर आ. आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे खंडन करून आरोप फेटाळून लावले होते व आपली बदनामी कराल तर थेट दावा ठोकण्याचाच इशारा देऊन विवेक कोल्हे यांच्यावर पलटवार केला होता. यावर प्रकरण थांबले नाही यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये गोळीबारातील आरोपी नाजीम शेख हा तुमच्या दहीहंडीचा कार्याध्यक्ष होता हे सगळ्या कोपरगावकरांनी पाहिले आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी गुन्हेगार प्रवृत्तीला राजाश्रय देऊन आमच्यावर दावा ठोकण्याची भाषा करता आता जनताच तुमच्यावर दाबा ठोकणार आहे असे प्रत्युत्तर दिले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याने आ. आशुतोष काळे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी खुलासा करताना काळे परिवाराने कधीही गुन्हेगारीला थारा दिला नाही उलटपक्षी गोळीबारात जखमी झालेला आरोपी तनवीर रंगरेज हा 2019 च्या निवडणुकीत कोल्हे यांचा प्रचारक असल्याचे थेट फोटो पत्रकारांसमोर ठेवले.
पत्रकार परिषदेमध्ये विवेक कोल्हे यांनी गोळीबार करणारा आरोपी नाजीम शेख हा आमदार काळे यांचा कार्यकर्ता असल्याचे फोटो व्हिडिओ दाखवून आरोप केल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी झालेला आरोपी तनवीर रंगरेज हा विवेक कोल्हे यांचा कार्यकर्ता असल्याचा फोटो दाखवून प्रत्युत्तर दिले आहे यातून थोडक्यात गोळीबार प्रकरणावरून काळे कोल्हे यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत कोण गुन्हेगारांना राजाश्रय देत यावरून नेत्यासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे एकमेकावर चिखलफेक केली जात आहे मात्र ज्या अवैध धंद्यातील वर्चस्वावरून सुरू झालेल्या स्पर्धेतून गोळीबार झाला ते दोन नंबर धंदे मात्र तेजीत सुरू असून कुठलाही राजकीय पदाधिकारी यावर बोलायला तयार नाही राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे आपल्याच नेत्याचे आपण नैतिक हनन करत असल्याचे कोणाच्याही लक्षात येत नाही अवैध धंद्याच्या मूळ प्रश्नाला यामुळे बगल मिळाली असून आ. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन करून कुठेतरी आघाडी घेतली होती मात्र या गोळीबार प्रकरणामुळे नक्कीच त्याला कुठेतरी धक्का लागला असल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे राजकारणाचा लाभ नफा कुणालाही आणि कसा आहे व काहीही असला तरी अवैध धंद्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे सणावाराचे दिवस असल्याने पोलीस प्रशासनालाच आता यात लक्ष घालून अवैध धंद्यांना आळा घालण्याची भूमिका बजावावी लागणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.