बिपिन कोल्हे करणार का ? दसऱ्याला ‘राजकीय सीमोल्लंघन?

बिपिन कोल्हे करणार का ? दसऱ्याला ‘राजकीय सीमोल्लंघन?

Will Bipin Kohle? Dussehra ‘political boundary crossing?

स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या विना  होणारी निवडणूक कोल्हे कुटुंबासाठी कसोटीची

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sun29, Sep 19.40 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :  कालपरवा संजीवनी कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बिपिन कोल्हे यांनी आपण दसऱ्यानंतर राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे  जाहीर एल्गार केला. आता त्यांच्या या घोषणेमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. कार्यकर्त्यात मात्र मोठा उत्साह दिसून येत आहे. असे असले तरी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या विना होणारी ही निवडणूक कोल्हे कुटुंबासाठी कसोटीची  व नव्या पिढीला आवाहन देणारी आहे.

स्वतःच्या  कोल्हे कुटुंबाचे  राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व  विवेक कोल्हे यांना विधानसभेत पाठविण्याकरीता  बिपीन कोल्हेंसाठी ही विधानसभा निवडणूक अतिशय महत्वाची असणार आहे. मागच्या निवडणुकीत झालेला निसटता पराभव कमी पडलेली मते यामुळे मोजावी लागलेली राजकीय किंमत याचे गेल्या पाच वर्षात कोल्हे परिवाराने नक्कीच आत्मचिंतन केले असेल त्यामुळे मतदार संघातील जनाधार  वाढविण्यासाठी  एक नवी रणनीती आणि उमेद घेऊन बिपिन कोल्हेंना निवडणुकीच्या रणांगणात उतरावेच लागणार आहे. याचा श्री गणेशा कुटुंबातून करावा लागेल.
कोपरगाव विधानसभा २०१९ च्या गत  निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बिपिन कोल्हे हे सुरुवातीला विधानसभा निवडणुका लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसले नाही. मात्र, यावेळी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या घरातील उमेदवारासाठी पदाधिकारी आणि नेते यांच्या आग्रहामुळे बिपिन कोल्हे आता विधानसभेच्या रणांगणात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर दसऱ्यानंतर राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे सुतोवाच करून स्वतः विधानसभा निवडणुकीतून आपल्या कोल्हे गटात आलेली मरगळ दुर करत राजकीय सीमोल्लंघन करणार का, हे पहावे लागणार आहे. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची मोठी पोकळी येणाऱ्या निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्व कोल्हे कुटुंबाला एकत्र येऊन पुन्हा एकदा २०१४ च्या निवडणुकीत दाखविली तशी  एकत्रित ताकद आणि बिपिन कोल्हे यांचा करिश्मा उमेदवाराला तारण्यास यशस्वी होवू शकतो.         
कोल्हेंच्या  सीमोल्लंघनाची तयारी, पण नव्या सीमा कोणत्या?
येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती आणि महाआघाडीमुळे उमेदवारीचा पेज निर्माण झाल्याने राज्यासह जिल्ह्यातील अनेक नेते सीमा ओलांडून वेगळ्या राजकीय दिशेने निघण्याच्या तयारीला लागले आहेत. कोणी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) तर कोणी शिवसेना (ऊबाठा)च्या जवळ जाण्याचा प्रयत्नात आहे. कोण कसे सीमोल्लंघन करणार याकडे कोपरगावकरांचे  लागले आहे.          यावेळी विवेक कोल्हे  यांचे भाजपामधून सीमोल्लंघन घडवून आणायचे ठरवले आहे. जर तेही शक्य झाले नाहीच तर विवेक कोल्हे  हे राष्ट्रवादी काँग्रेस (शप)अथवा शिवसेना (उबाठा) मध्ये सीमोल्लंघन करतील अशीही चर्चा आहे. गेल्यावेळी कोपरगावातुन  भाजपातून लढलेले कोल्हे यांच्यासमोरही कोणते सीमोल्लंघन करायचे असा पेच उभा राहिला आहे. कोपरगावातूनच पुन्हा विधानसभेसाठी सीमोल्लंघन करायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. मात्र, या  मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच दसरा साजरा होणार असल्याने तो आपल्याकडे कसा घेता येईल, याचा प्रयत्न ते चिकाटीने करताना दिसतात. त्यासाठी ते शरद पवार यांच्यासोबत गाडीत बसून जातील की‘उद्धव ठाकरे’ यांना दसर्‍यानिमित्त आपट्याचे पान घेऊन मातोश्री वर जातील का? याची उत्सुकता आहे.
गेल्या पाच वर्षांत शहर व विधानसभा मतदार संघातून चर्चेत राहिलेल्या विवेक कोल्हे  यांचे सीमोल्लंघन विधानसभेसाठी होईल अशीही चर्चा रंगत आहे. पण त्यांना ही संधी त्यांचे मातापिता देतील का? हाही प्रश्‍न आहे. कमळाला हातात घेऊन नाही जमले तर तुतारी किंवा मशाल हाती घेऊन विधानसभेच्या मैदानावर उतरण्याचे  प्रयत्न कोल्हे यांनी  जोरदार सुरू केल्याची चर्चाही रंगली आहे.  कोल्हे हे सीमा ओलांडणार हे जवळपास निश्चितच आहे. पण नवी सीमा शिवसेना उद्धव ठाकरे की राष्ट्रवादी शरद पवार? यातच ते चाचपडत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page