गोळीबारातील त्या’ आरोपीवर कारवाई करा अन्यथा आंदोलन. …   .                

गोळीबारातील त्या’ आरोपींवर कारवाई करा अन्यथा आंदोलन. …   .                

Take action against those ‘accused’ in the firing or agitation. …   .                

दहा दिवसाचा अल्टीमेटम आज संपला २ ऑक्टोबरला अमरण उपोषण

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Mon30, Sep.20.00 Pm.By सालकर राजेंद्र 

कोपरगाव,  : कोपरगाव गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीने व्हिडिओत नावे घेतलेल्या ‘त्या’ आरोपींवर दहा दिवस उलटूनही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही. या विरोधात  येत्या बुधवारी गांधी जयंती २ ऑक्टोबर पासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कोल्हे गटाच्या दत्ता काले यांनी  सोमवारी पत्रकार परिषदेमधून दिला आहे.  

यावर बोलतांना दत्ता काले म्हणाले, गेल्या पाच वर्षात अवैध धंदे बोकाळले असून राजाश्रयामुळे दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करण्याची हिम्मत झाली आहे. रेशन तस्करी नियोजनबद्ध पद्धतीने होत असून त्यांनी एरिया वाटून घेतला आहे.  अवैध धंदे करून उजळ माथ्याने फिरणाऱ्यांमुळे सामान्य  नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे.  हा गोतावळा कोणाचा? असा सवाल काले यांनी केला.
१३० रेशन दुकानापैकी  शंभर दुकानदार कोल्हे पार्टीचेच आहे. रेशन वाहतूक करणारा ठेकेदार हाही तुमच्याच कर्मचाऱ्यांचा मुलगा असल्याचा आरोप ही विरोधकांनी केला आहे. यावर आपण काय म्हणाल ?
त्यावर दत्ता काले म्हणाले, कोल्हे यांची सत्ता होती, त्या काळात त्यांनी अनेकांना रोजी रोटीसाठी  रेशन दुकानाचे परवाने दिले परंतु मुळात रेशनची तस्करी ही रेशन दुकानातून होत नाही तर ती गोडाऊन मधून होत असल्याचा गौप्यस्फोट  काले यांनी केला, यावेळी चर्चेत भाग घेत बबलू वाणी म्हणाले रेशन दुकानांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड ग्राहकाचे थम्स घेतला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी काळाबाजार होण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्टीकरण दिले.
काही दिवसांपूर्वी एका तरुण पुरवठा निरीक्षकांने आत्महत्या केली याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे अशी मागणी काले यांनी केली , गोळीबार करणाऱ्या आरोपीचे कॉल रेकॉर्ड हे पोलिसांनी तपासण्याची गरज असल्याचे  काले यांनी यावेळेस म्हटले, विवेक कोल्हे  हे जनतेच्या बाबतीत जागरूक असून त्यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी  लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने जनआक्रोश आढावा बैठक घेत असतात. असेही दत्ता काले म्हणाले
अवैध धंद्यामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे काहीजण असल्याचा विरोधकांचे म्हणणे आहे याबाबत आपण काय करणार ? 
यावर दत्ता काले म्हणाले, जर आमचा  कोणी कार्यकर्ता अवैध धंद्यामध्ये असल्याचे सिद्ध झाले तर त्याला पार्टीतून काढून टाकू  असे सांगितले. गुन्हेगार टोळ्यांमध्ये मांडवली  करणारा ‘सचिन” कोण ? याचा पोलिसांनी तपास लावला पाहिजे म्हणजे सर्वच सत्य बाहेर येईल असे आवाहन काले यांनी शेवटी पोलिसांना केले.
पडदे लावून चौकाचौकात सुरू असलेल्या
अवैध धंदे व अमली पदार्थांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत विजय आढाव म्हणाले, गेल्या पाच वर्षात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दारू रस्त्यावर विकली जात आहे. या व्यवसायांत अनेक तरुण गुरफटले जात आहेत. अवैध धंदे वाढल्यामुळे तरुणाई व्यसनाधीन झाली आहे. युवा पिढी बरबाद होत असल्याने याबाबत तत्काळ योग्य ती भूमिका घेण्यात घ्यावी, पोलिसांवर दडपण कोणाचे आहे ?  याचा शोध घ्यावा लागेल संपूर्ण पिढी नासविण्याचे काम चालू आहे  स्वर्गीय काळे आणि कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना नोकऱ्या देऊन कार्यकर्ता सुसंस्कृत केला. आज मात्र आपले राजकारण बंद पडेल या भीतीपोटी दोन नंबर धंदेवाल्यांना राजाश्रय दिला जात आहे. पिढी बरबाद होत आहे तरुणांना वाचविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावेच लागेल असा थेट इशाराच आढाव यांनी पत्रकार परिषदेमधून दिला.
  १९ सप्टेंबर रोजी कोपरगाव शहरात पोलीस स्टेशन नजीकच्या अंतरावर दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबार झाला यात जखमी झालेल्या आरोपीने आमदार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांचे नाव या प्रकरणात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या आधार घेत दहा दिवसापूर्वी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहर पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी पोलिसांना दहा दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला मंगळवारी (१ऑक्टोबर) रोजी  अल्टीमेटम पूर्ण होत असून पोलिसांना दिलेल्या अल्टीमेटम च्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी सहा वाजता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात
कोल्हे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अद्यापही पोलिसांनी कारवाई केलेली नाही याबाबत नाराजी व्यक्त करत इशारा दिल्याप्रमाणे गांधी जयंती २ ऑक्टोबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा   पत्रकार परिषदेमधून दिला आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून, त्यामागील दडलेल्या राजकीय व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी  करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक बबलू वाणी संदीप देवकर यांनी चर्चेत भाग घेतला.
चौकट
 आमदार काळे यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांनी आमचे जाहीर आव्हान स्वीकारावे म्हणजे आमच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्ह मधील सत्य आंबेडकर मैदानावर जाहीरपणे दाखवू – विजय आढाव 

Leave a Reply

You cannot copy content of this page