पाच नंबर साठवण तलावात भ्रष्टाचार झाल्याचा संशय कायम; क्लीन चिट कोणालाच देणार नाही – संजय काळे
Suspicion of corruption in No. 5 storage pool remains; Will not give clean chit to anyone – Sanjay Kale
तळ्याचे माप बरोबर असल्याचा निर्वाळा
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat6, Sep.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : जोपर्यंत मला एस्टिमेटची कॉपी भेटत नाही तोपर्यंत इथे भ्रष्टाचार झाला की नाही हे मी सांगू शकत नाही परंतु आज मी कोणालाही क्लीन चीट देणार नाही असे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी स्पष्ट केले.
संजय काळे पुढे म्हणाले, माहिती अधिकारात मागितलेल्या माझ्या मागणीप्रमाणे शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी पाच नंबर साठवण तलावाच्या खोली लांबी रुंदी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने माझ्या समक्ष मोजणी केल्यानंतर ती मापे मी माझ्या ज्ञानाप्रमाणे टाकली आणि क्षेत्रफळ काढलं त्याचा व्हॅल्यूम काढल्यानंतर असे निदर्शनास आले की ४४ कोटी ६२ लाख ७७ हजार ८६३ लिटरच हे तळ तयार झालं आहे याला एम एल च्या भाषेत म्हणायचे तर हे तळ ४४ एम. एल. चे झाले आहे. कोपरगाव नगरपालिकेने जे तळे खोदले बांधले त्याच्यात भ्रष्टाचार झाला की नाही हा भाग पुढे आहे आजच्या मितिला जे कोपरगावला पाणी मिळणार आहे त्या तळ्याची क्षमता पकडली होती ती बरोबर आहे. असे ते म्हणाले
पुढे बोलताना काळे म्हणाले प्रत्यक्षात समुद्रसपाटीपासून तळ्याचा तळ ५१४ मीटर उंचीवर आहे तर वरचा भाग ५२२ मीटरवर आहे तळ्याचा अभ्यास करता हे तळे अजून दोन मीटर खोल असते तर आणि उंची कमी केली असती तर ग्रॅव्हिटीने पाणी भरता आले असते प्रत्यक्ष बघितल्यानंतर हा सापडलेला मुद्दा आहे कारण आपण गोदावरी कालव्याचा तळ पाहिला तर तो ५१४ मीटर वर आहे आपली खोली ५१२ मीटर असती तर आपल्याला मोफत पाणी पुरवठा झाला असता विज बिल लागले नसते कारण आता तळे भरण्यासाठी चार मीटर पाणी उचलून भरावे लागत आहे. आज तळ्यातून पाणी बाहेर काढण्याची पाईपलाईन अपूर्ण आहे. मी त्या अधिकाऱ्यांना आणि त्या ठेकेदाराला प्रश्न विचारला तुम्ही पंपिंग करून पाणी टाकता त्या मोटारी किती एचपीच्या आहे तर एक अधिकारी सांगतो ४० हॉर्स पावरच्या तर दुसरा अधिकारी म्हणतो अडीचशे हॉर्स पावरच्या म्हणतो त्यांच्यातच ताळमेळच नव्हता ज्या पाईपलाईनने तुम्ही पाणी टाकणार आहात ती पाईपलाईन किती इंची आहे तेही त्यांना सांगता आले नाही अशा परिस्थितीमध्ये या स्कीमचे ज्ञान असलेला कुठलाच व्यक्ती त्या तळ्यावर सापडला नाही ही शोकांतिका आता भ्रष्टाचार झाला की नाही यासंदर्भात आज मी भाष्य करू शकत नाही कारण मला माझी माहिती प्रलंबित आहे. तळे ज्या मापाचे पाहिजे होते त्या मापाचं आहे परंतु भ्रष्टाचार किती झाला हे मात्र सांगता येणार नाही असे सांगताना संजय काळे यांनी भ्रष्टाचाराबाबत संशय कायम ठेवल्याचे दिसते.
चौकट
पाच नंबर साठवून तलावाच्या खोलीबाबत शंका असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या वावड्या उठल्या होत्या तर याप्रकरणी विरोधकांकडून मोठा हल्लाबोल करण्यात आला होता. मोजणीनंतर खोली लांबी रुंदी बरोबर असल्याचा प्राथमिक निर्वाळा संजय काळे यांनी दिला असल्याने आपसूकच या प्रकरणावर पडदा पडला असला तरी या कामात भ्रष्टाचार झाला आहे का ? हा संशय त्यांनी कायम ठेवल्याने प्रकरणातील सस्पेन्स कायम आहे.
Post Views:
38