बाजारपेठ भयमुक्त झाल्यास खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल – रेणुका कोल्हे 

बाजारपेठ भयमुक्त झाल्यास खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल – रेणुका कोल्हे 

If the market is free from fear, it will help increase the flow of purchases – Renuka Kolhe

कोपरगाव व्यापारी महासंघाची भव्य ग्राहक सन्मान योजना

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Sat5, Sep.19.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: महिला भगिनी गोळीबार, अपहरण,खून,चोऱ्या अशा घटनांनी घाबरतात त्याचा थेट परिणाम खरेदीवर होतो व बाहेर जाण्याऐवजी लोक ऑनलाईन पर्याय निवडतात यासाठी या घटना देखील रोखणे आवश्यक असून बाजारपेठ भयमुक्त झाल्यास स्थानिक बाजारात खरेदीचा ओघ वाढण्यास मदत होईल असा विश्वास संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे अध्यक्ष रेणुका कोल्हे यांनी व्यक्त केला.

ऑनलाइन खरेदीमध्ये आपली होणारी लूट व फसवणूक टाळण्यासाठी आपली स्थानिक बाजारपेठ फुलावी यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित भव्य ग्राहक सन्मान योजना 2024 घोषित करण्यात आली आहे.या उपक्रमामध्ये संजीवनी उद्योग समूह सहप्रायोजक आहे.
यावेळी बोलताना रेणुका कोल्हे म्हणाल्या 
आपण बहुपर्यायी वस्तूंचे भांडार उपलब्ध ठेवले तर ऑनलाइन खरेदीकडे ग्राहक वळणार नाही व त्याची फसवणूक ही होणार नाही परिवाराने बाजारपेठ गतिमान होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. व्यापारी महासंघाचा देखील हाच प्रयत्न आहे आपली बाजारपेठ आपला अभिमान हा विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
या उपक्रमात मोटारसायकल, टिव्ही, फ्रिज, मोबाईल,नथ,मिक्सर, ओव्हन,होम थिएटर, वॉशिंग मशीन,ट्रॉली बॅग यासारखे लाखोंची भरीव बक्षिसे ठेवण्यात आली आहे.खरेदी केल्यानंतर एक कूपन नाव आणि मोबाईल नंबर टाकून भरणे आवश्यक आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार महेश सावंत,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,मुख्याधिकारी सुहास जगताप, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,चैताली काळे,सुधीर डागा, प्रदीप साखरे,राजेंद्र बंब,रमेश शिरोड़े,बबलू वाणी,रवींद्र पाठक,योगेश बागुल,जनार्दन कदम, विवेक सोनवणे,वैभव गिरमे, सनी वाघ,भरत मोरे,संतोष गंगवाल,तुलसीदास खूबानी,आशुतोष पटवर्धन, प्रीतम बंब, परेश उदावंत,चांगदेव शिरोडे यासह अनेक व्यावसायिक,व्यापारी महासंघाचे सर्व सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page