उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हेंशी दुसऱ्यांदा चर्चा; पेच सुटणार
Deputy Chief Minister Devendra Fadnavis’ second discussion with Kolhe; Embarrassment will be solved
Rajendara C. Salkar,
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Tue 22, Oct.19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: महायुतीच्या उमेदवार फार्मूल्यामुळे उद्भवलेल्या उमेदवारीचा पेच संदर्भात कोल्हे यांनी भाजप सोडण्याची भूमिका घेऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचेसोबत आज (दि. २२) दुसऱ्यांदा चर्चा केली. यावेळेस त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते असे समजते. त्यामुळे आता पेच सुटणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे तिकीट निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघातून युवा नेते विवेक कोल्हे इच्छुक आहेत. यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सात दिवसांपूर्वी १६ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची बैठक झाली होती. कोपरगावचा पेच सोडवण्यासाठी यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरल्याचे दिसून आले. कोल्हे कुटुंबियांची मनधरणी करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.ज्याचा आमदार त्याला उमेदवारी या महायुतीच्या उमेदवार फार्मूल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे तिकीट निश्चित झाले आहे. यामुळे कोल्हे कुटुंबियांची राजकीय अडचण झालीय. कोल्हे आणि काळे पारंपरिक राजकीय विरोधक आहे. तर स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. निवडणूक लढवण्यासाठी कोल्हे कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.उमेदवारीबाबत उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी कोल्हे यांनी मशाल व तुतारी हातात घेऊ नये त्यांनी भाजपा मध्येच थांबावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी आज दुसऱ्यांदा चर्चा केली यावेळेस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील चर्चेमध्ये सहभाग घेतल्याचे समजते यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑक्टोंबर रोजी स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली होती.यानंतर आज दि. २२ ऑक्टोबर रोजी स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीसाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कोपरगावचा पेच सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी कोल्हे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. कोल्हे कुटुंबीयांनी भाजपसोबतच राहावे यासाठी वरिष्ठांकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्याशी आज दुसऱ्यांदा चर्चा केल्याचे खात्रीलायक रित्या समजते बंद दाराआड भाजप पक्षश्रेष्ठी यांच्याबरोबर आज कोल्हे यांची नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही परंतु या चर्चेनंतर कोल्हे यांनी तूर्तास थांबण्याचा निर्णय घेतल्यास कोपरगाव विधानसभेचा महायुतीचा राजकीय पेच येत्या काही तासातच सुटेल का ? . पर्यायाने आशुतोष काळे यांचा वनवे मार्ग मोकळा होईल का ? आणि कोपरगावचा हा पेच सोडवण्यात भाजप नेत्यांना यश येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यामुळे कोल्हेंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था, काळेंच्या कार्यकर्त्यात जल्लोष तर मतदार संघात राजकीय शांतता दिसत आहे.