आशुतोष काळेंची कोपरगाव शहरातून भव्य प्रचार रॅली
Ashutosh Kalen’s grand campaign rally from Kopargaon city
कोपरगावकरांचा कौल आशुतोष काळे यांनाच असल्याची जोरदार चर्चा There is a strong discussion that Kopargaonkar’s vote belongs to Ashutosh Kale
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon11, Nov.15.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: ‘ आमच्या आशुतोष दादाला तोडच नाही”,’ या गाण्याच्या सुरावटीत येऊन येणार कोण ? आशुतोष दादाशिवाय आहेच कोण ? अशा घोषणा देऊन मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ११नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. आशुतोष काळे यांची निशाणी असलेल्या घड्याळाच्या घोषणांनी कोपरगाव परिसर दुमदुमुन गेला. तसेच, या भव्य रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.या रॅलीमुळे कोपरगावकरांचा कौल आशुतोष काळे यांनाच असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संभाजी चौकातील कृष्णाई प्रचार कार्यालयापासून निघालेली रॅली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला.
उमेदवार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही रॅली कोपरे मार्गाने जाऊन सोमवारी भरलेल्या बैल बाजारातील प्रत्येक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यानंतर धारणगाव रोड, कोपरगाव एसटी बस आगारातील प्रत्येक प्रवाशाला भेटत रॅली व आगाराच्या बाहेर आली रॅलीत अग्रभागी असलेल्या उमेदवार आमदार अशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रॅली
पुढे सोमवार आठवडे बाजारात पुनम सिनेमागृहाच्या रस्त्याने मार्गस्थ होऊन गोरक्षनाथ मंदिर, सराफ बाजार, शिवाजी रोड, बिरोबा चौक, गांधी चौकातून पुढे आली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली गांधी चौकातून पुढे मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाली छ. शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. पुढे विघ्नेश्वर मंदिर येथे रॅली आली. गणेश मंदिरात आशुतोष काळे यांनी दर्शन घेवून रॅली मुख्य रस्त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून धारणगाव रस्त्याने कृष्णाई प्रचार कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. सर्वात शेवटी धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
कोपरगाव शहरातून निघालेल्या प्रचार रॅलीत उमेदवार अशितोष काळे यांच्यासह सुनील गंगुले कृष्णा आढाव, मंदार पहाडे, विजय वहाडणे यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हजारो जनसमुदाय या रॅलीत सहभागी झाला.
Post Views:
21