कोल्हे कुटुंबाचे योगदान उल्लेखनीय – गिरीश महाजन

कोल्हे कुटुंबाचे योगदान उल्लेखनीय – गिरीश महाजन

Contribution of Kolhe family is remarkable – Girish Mahajan

दीपावली फराळानिमित्त महाजन यांची कोल्हे निवासस्थानी भेट Mahajan’s visit to the Kohle residence on the occasion of Diwali Farala

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun10, Nov.19.10 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव: विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात पक्षाच्या हितासाठी दोन पावले पक्षाची विनंती ऐकून भूमिका घेतलेल्या कोल्हे कुटुंबाचे कौतुक आहे.तुमचे प्रश्न सुटण्यासाठी ज्या भावना आपल्या सर्वांच्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत.दीपावली फराळानिमित्त कोल्हे निवासस्थानी ना.गिरीश महाजन यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

वाघ जेव्हा मोठी झेप घ्यायची असते तेव्हा दोन पावले मागे येतो या धोरणाने आपले काम आहे.अनेक प्रश्न सुटण्याची भूमिका मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी पक्षाकडे वारंवार मांडली.त्यांची कामाची तळमळ, कोल्हे कुटुंबाचा सामाजिक योगदानाचा असलेला आलेख हा मोठा आहे.
वर्तमानात काम करत असताना पक्ष पुढचे पंचवीस वर्षे हवे असणारे नेतृत्व टिकवत असतो वाढवत असतो. खात्रीशीर विजयी होणारी जागा होती आणि सर्वच पक्षांनी ऑफर दिलेल्या होत्या तरीही आपण पक्षासोबत राहिलात ही निष्ठा भविष्यातील राजकीय वाटचालीत मोलाची ठरेल.
भाजपा हा जगातील सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या पक्षासाठी त्यागाच्या या भावनेने चांगले फलित होणार आहे. राजकीय युद्धात संघर्षाच्या काळात कोण साथ देतो त्याची दखल घेणारे आम्ही सर्व आहोत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनाची दखल घेतली गेली असून योग्य निर्णय झाला होता याची अनुभूती सर्वांना येईल.
स्व.शंकरराव कोल्हे यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि पाणी या विषयावर काम केले.निळवंडे धरण,पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळवण्याच्या भन्नाट योजना त्यांच्याकडे होत्या ज्या आजही कोल्हे कुटुंब पूर्ण होण्यासाठी आग्रही आहे.येणाऱ्या काळात सर्व मागण्या उचित न्याय देऊन पूर्ण होतील हा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी राजेंद्र त्रिवेदी,माजी विधानसभा अध्यक्ष गुजरात,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे, डॉ. शिरीष भट,प्रभारी कोपरगाव विधानसभा संयोजक डॉक्टर सेल-भाजपा गुजरात, संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे आदीसह सर्व कोल्हे कुटुंबीय व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page