तरुण पिढीचे भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध-आ.आशुतोष काळे

तरुण पिढीचे भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध-आ.आशुतोष काळे

Committed to building the future of the young generation – Ashutosh Kale

एमआयडीसीच्या माध्यमातून बेरोजगारी कायमची हटणार Unemployment will be eliminated forever through MIDC

संजयनगर कॉर्नर सभा

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed13, Nov.15.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव :मतदार संघातील युवकांना एमआयडीसीच्या माध्यमातून मतदार संघातच रोजगार उपलब्ध होणार असून मतदार संघातील बेरोजगारी कायमची हटली जाणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

२०१९ ला मतदार संघातील जनतेने मला आशिर्वाद दिले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पाच वर्षात मतदार संघाचे विविध विकासकामे मार्गी लावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतांना त्यांच्या मदतीने विकासासाठी मोठा निधी मिळविला व मतदार संघातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. राज्यातील विविध विकसित मतदार संघाच्या झालेल्या विकासाचा अभ्यास करून यापुढील काळात सर्वच बाबतीत कोपरगाव मतदार संघ विकसित मतदार संघ म्हणून नावारूपाला आणायचा आहे. आजवर रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध नसल्यामुळे मतदार संघातील युवकांना रोजगारासाठी मतदार संघाच्या बाहेर जावे लागत होते. परंतु भविष्यात हि परिस्थिती बदलणार असून येणाऱ्या काळात मतदार संघातील सोनेवाडी व सावळीविहीर गावच्या सीमेवर उभारल्या जाणाऱ्या एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग उभे राहणार आहेत.

विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसा कोपरगाव मतदार संघात आ.आशुतोष काळे यांच्या प्रचाराचा वेग अधिकच वाढला आहे. मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांशी व्यक्तिगत संपर्क ठेवून असलेल्या आ. आशुतोष काळे यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकमतदारापर्यंत ते पोहोचले आहेत व कॉर्नर प्रचार सभांच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासाच्या संकल्पना मांडत असून या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. कोपरगाव शहरातील संजय नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधतांना यापुढील काळात मतदार संघातील बेरोजगारी कायमची हटविण्याबाबत सुतोवाच करतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील सोनेवाडी व सावळीविहीर गावच्या सीमेवर एमआयडीसीला मंजूरी मिळून काही दिवसांपूर्वी भूमिपूजन देखील झाले आहे. सोनेवाडी, सावळीविहीर पंचक्रोशीतीलच नव्हे तर मतदार संघातील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होवून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मतदार संघाच्या विकासात युवकांच्या हिताला प्राधान्य देवून तरुणाईला सहभागी करून घेवून त्यांचे उज्वल भविष्य घडवायचे आहे. त्यामुळे यापुढील काळात मतदार संघातील सर्वच बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील एकूण १७३.३४ हेक्टर म्हणजेच ४३३ एकर उपलब्ध असलेली जागा एम.आय.डी.सी.कडे वर्ग करण्याबाबत सविस्तर चर्चा होवून पालकमंत्री व उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याठिकाणी एम.आय.डी.सी. उभारण्याचा मनोदय आहे. त्या एमआयडीसी मध्ये विविध प्रकारचे व्यवसाय उपलब्ध होतील. त्यातून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला यांनाही यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मतदार संघातील रस्त्यांची निर्मिती, पाणी व आरोग्याचे प्रश्न सोडवून नागरिकांच्या अडचणी दूर करून मूलभूत सुविधा देणे हे तर माझे कर्तव्य आहे परंतु मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हि आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे. स्थानिकांना रोजगार मिळेल याबाबत निश्चिंत रहावे.भविष्यात इतर विकसित शहराच्या बरोबरीत कोपरगाव मतदार संघाचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मतदार संघातील जनतेची साथ आणि आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असून २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page