आमदार आशुतोष काळे यांच्या  महाविजयाची  कारणे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, आणि कोल्हे.       

आमदार आशुतोष काळे यांच्या  महाविजयाची  कारणे..’, लाडकी बहीण, पायाभूत सुविधा, आणि कोल्हे.       

 

Reasons for MLA Ashutosh Kale’s great victory..’, Beloved sister, infrastructure, and Kohles.

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Sat23 Nov  20.00 Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : महायुतीच्या विजयाप्रमाणेच  कोपरगाव विधानसभेसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या महाविजयासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. निवडणुकीपूर्वी चार महिने ही योजना आणत महायुती सरकारने चित्र बदलून टाकले. कोपरगाव मतदार संघात शहत्तर हजारहून अधिक  महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये दिवाळीपूर्वीच मिळाले होते.  महायुती सरकारने प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने महिलांचा विश्वास महायुतीवर अधिक बसला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावच्या सभेत कोपरगावच्या जनतेला आशुतोष ला जादा मताधिक्याने निवडून द्या मी त्यांना तुमच्या मनातील मंत्री करतो असे आश्वासन दिल्याचा सुद्धा परिणाम झाल्याने मतदारांनी मोठे मताधिक्य आशुतोष काळे यांना दिले. महायुतीचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांनी कोल्हे यांना थांबविले आणि महायुतीचे काम करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे कोल्हे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आशुतोष काळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हे परिवाराने व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे आमदार आशुतोष काळे यांना सव्वा लाखाचे मतदान मताधिक्य मिळाले त्यांच्या या महाविजयाने कोपरगाव लोकसभा मतदार संघात मताधिक्याचा इतिहास घडला याचबरोबर राज्यातील पहिल्या दहा उमेदवारात मताधिक्य घेण्याचा मानही त्यांना मिळाला आशुतोष काळे यांनी आपल्या विजय मिरवणुकीत कोल्हे परिवाराचे आभार मानले आहे आपले परिवाराने केवळ कोपरगाव मतदारसंघातच नव्हे तर शिर्डी मतदार संघातही प्रामाणिकपणे महायुतीचेच काम केले असल्याचे दोन्हीकडील मताधिक्यामुळे दिसून येत आहे अशी चर्चा आता जनतेमध्ये सुरू आहे  आमदार आशुतोष काळे यांच्या विजयाने  काळे कोल्हे एकत्र आले तर कोपरगावात इतिहास घडू शकतो हे दाखवून दिले. याचबरोबर काळे कोल्हे तिसऱ्या शक्तीला पुढे येऊ देत नाही ही परंपरा याही वेळेस या निवडणुकीत कायम राहिल्याचे  काही जण म्हणताना दिसतात  या महाविजेयात आमदार आशुतोष काळे यांनी शहरातला पाणी प्रश्न  सोडविण्यासाठी जे काम केले ते शहरातील नागरिकांना भावले विशेषता महिला वर्गांमध्ये याची समाधान दिसून आले त्यांनी महायुतीच्या काळात गेल्या पाच वर्षात विकासासाठी जो मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि जी कामे केली त्याचे समाधान सुद्धा ग्रामीण भागात दिसून आले  यामुळे  त्यांना हे मोठे यश मिळवले. कोल्हे गटाच्या गटाच्या प्रभावक्षेत्रात आशुतोष काळे यांना मताधिक्य आहे  तूर्तास एवढेच म्हणावे लागेल संपूर्ण मतदान केंद्रनिहाय ज्यावेळेस मतदानाचे काकडे येतील आकडेवारी येईल त्यामुळे स्पष्ट व विस्तृत विश्लेषण करता येईल

Leave a Reply

You cannot copy content of this page