आशुतोष काळे मंत्री व्हावेत; कोपरगावकरांच्या अपेक्षा वाढल्या
Ashutosh Kale should become a minister; Kopargaonkars’ expectations increased
काळे घराण्याकडे 46 वर्षानंतर मंत्रीपद तर कोपरगावला 31 वर्षानंतर मंत्रिपदाची संधीKale family gets ministerial post after 46 years, Kopargaon gets ministerial post after 31 years
85000 च्या पुढे जाऊन 40000 चे ज्यादा मताधिक्य A huge margin of 40,000 votes, going beyond 85,000
कोपरगाव: अजित पवार यांनी पूज्य पूज्य पूज्य असे म्हणत 85000 मतांच्या मताधिक्याची अपेक्षा केली होती परंतु कोपरगावकरांनी 85000 च्या पुढे जाऊन आणखी 40 हजाराचे मताधिक्य देऊन इतिहास घडविला. अहिल्या नगर जिल्ह्यात एक नंबर येण्याचा बहुमान मिळविणाऱे आशुतोष काळे मंत्री व्हावेत; कोपरगावकरांच्या अपेक्षा वाढल्या,
१९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये कर्मवीर शंकरराव काळे शिक्षण व सहकार खात्याचे राज्यमंत्री होते आज जर आशुतोष काळे यांना मंत्रीपदाची संधी मिळाल्यास तब्बल ४६ वर्षानंतर काळे घराण्याकडे मंत्रिपद येणार आहे. तर स्वर्गीय शंकरराव कोल्हे 1992-1993 -मंत्री, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क,कमाल जमीन धारणा, महाराष्ट्र राज्य, होते त्यांच्यानंतर तब्बल ३१ वर्षानंतर कोपरगावला मंत्री पद येणार आहे तसे शिर्डी साई संस्थानच्या अध्यक्षपदाच्या रुपाने काही काळ आशुतोष काळे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला होता.
याची पुनरावृत्ती व्हावी याचसाठी कोपरगाव विधानसभेला कोपरगावकरांनी आमदार आशुतोष काळे यांना सव्वा लाखाचे मतदान मताधिक्य दिले. त्यांच्या या महाविजयाने कोपरगाव विधानसभा मतदार संघात मताधिक्याचा इतिहास घडला, याचबरोबर राज्यातील पहिल्या 11 उमेदवारात मताधिक्य घेण्याचा मानही त्यांना मिळाला. विशेष बाब म्हणजे या ऐतिहासिक मताधिक्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. धनंजय मुंडे, ना. दादा भुसे, चंद्रकांत पाटील या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा कोपरगाव च्या आशुतोष काळे यांना मान मिळाला त्यामुळे आशुतोष काळे मंत्री व्हावेत अशा कोपरगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकसभेनंतर राज्यात महायुती बद्दल होत असलेल्या चर्चेमुळे महायुतीला ही निवडणूक कठीण जाऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार अशीच चर्चा दिसत होती. मात्र मतदारांनी विरोधकांच्या अपेक्षा फोल ठरविल्या, यामुळे राज्याच्या राजकारणात यावेळी काळे यांचे राजकीय वजन निश्चितच वाढले आहे. अशी चर्चा आता जनतेमध्ये सुरू आहे आ. आशुतोष काळे यांच्या विजयाने आ. आशुतोष काळे यांनी शहरातला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जे काम केले ते शहरातील नागरिकांना भावले, विशेषता महिला वर्गांमध्ये याचे समाधान दिसून आले त्यांनी महायुतीच्या काळात गेल्या पाच वर्षात विकासासाठी जो मोठ्या प्रमाणात निधी आणला, आणि जी कामे केली. त्याचे परिणाम सुद्धा ग्रामीण भागात दिसून आले. यामुळे त्यांना हे मोठे यश मिळवले. संपूर्ण मतदान केंद्रनिहाय ज्यावेळेस मतदानाची आकडेवारी येईल त्यांच्यानंतर स्पष्ट व विस्तृत विश्लेषण करता येईल. तूर्तास आ. आशुतोष काळेंच्या महाविजय म्हणजे महायुती व आशुतोष काळे यांच्यावर मतदारांनी दाखविलेला विश्वास असे म्हणावे लागेल आता अजित पवारांच्या भाषेत म्हणायचे तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आशुतोष काळेंवर विश्वास दाखविला आता त्यांना मंत्रिपद देऊन विश्वास सार्थ करण्याची तुमची बारी आहे आता तुम्हीची पक्षाची पाळी आहे असे कोपरगावकरांचे म्हणणे आहे