राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 11 आमदार कोण? आशुतोष काळे 4 नंबरला तर ‘या’ उमेदवाराची बाजी
तर मताधिक्यात अहिल्यानगर जिल्ह्यात आशुतोष काळे एक नंबरला
Who are the top 11 MLAs with the highest number of votes in the state? Ashutosh Kale is at number 4 while ‘this’ candidate wins
राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या आमदारांमध्ये महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही हे विशेष.
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sun24 Nov 9.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: राज्यात 230 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 132 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या अकरा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर त्या खालोखाल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी 1.41 लाखांचं मताधिक्य घेतलं, तिसऱ्या नंबर वर बागलाण दिलीप बोरसे (भाजप) – यांनी 129297 मतांनी विजयी, त्या खालोखाल चौथ्या नंबरवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कोपरगावचे आशुतोष काळे 1 लाख 24 हजार 624 मताधिक्य घेतलं मताधिक्यात अहिल्यानगर नगर जिल्ह्यात एक नंबरवर आहेत.
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील 11 आमदार
1. सातारा मतदारसंघ- शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – 01 लाख 42 हजार 124 मताधिक्याने विजयी.
2. परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – 01 लाख 41 हजार 241 मतांनी विजयी
3. बागलाण- दिलीप बोरसे (भाजप) – 129297 मतांनी विजयी
4 कोपरगाव- आशुतोष काळे अजित पवार (राष्ट्रवादी)- एक लाख 24 हजार 624 मताधिक्याने विजयी
5. कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे (शिवसेना) – 01 लाख 20 हजार 335 मतांनी विजयी
6. कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप)- 1 लाख 12 हजार 41 मतांनी विजयी
7. ओवळा माजीवड – प्रताप सरनाईक (शिवसेना) – 1 लाख 9 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी..
8. मावळ मतदारसंघ – सुनील शेळके (राष्ट्रवादी) – 01 लाख 08 हजार 565 मतांची विजयी
9. चिंचवड मतदारसंघ – भाजपा उमेदवार शंकर जगताप – ०१ लाख ०३ हजार ८६५ मतांनी विजयी.
10. बारामती मतदारसंघ – राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार – 1 लाख 899 मतानी विजयी
11. दादा भुसे, मालेगाव बाह्य (शिंदे गट)= 1,02,440 मताधिक्य विजयी
Post Views:
47