गोदाकाठ महोत्सवाला कोपरगावकरांचा उदंड प्रतिसाद
Kopargaon residents respond overwhelmingly to Godakath Festival
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बचत गट, खवय्ये व कलाप्रेमींसाठी पर्वणी
Rajendara C. Salkar,
News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! , Sun12 Jan 25 19.00 pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : तीनशे बचत गटांच्या महिलांच्या पाककृती विविध वस्तूंच्या स्टॉलसह शालेय कलावंतांच्या कलात्मक ऊर्जेचा संगम घडवून आणणाऱ्या महात्मा गांधी चारिटेबल ट्रस्ट परिसरात सुरू असलेल्या गोदाकाठ महोत्सवाला रविवार असल्याने दुसऱ्या दिवशी देखील कोपरगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या वेळी खरेदीसाठी महिलांची खवय्यांची व कलाप्रेमी आणि रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून तसेच प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे व चैताली काळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव रविवारी (ता. १२) सकाळी १० ते रात्री १० पर्यंत ग्राहक महिला खवय्ये व कलाप्रेमींसाठी खुला असणार आहे.
या गोदाकाठ महोत्सवाचे विशेष म्हणजे बचत गटाच्या महिलांना अतिशय अल्प दरात ‘ना नफा-ना तोटा’ धर्तीवर स्टॅाल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. जवळपास तीनशेपेक्षा जास्त स्टॅाल्स वर बचत गटाच्या महिलांनी आपली घरगुती उत्पादने विक्रीसासाठी आणली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे

गोदाकाठ महोत्सवाची महती केवळ जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गोदाकाठ महोत्सव पोहोचल्यामुळे राज्याच्या विविध भागातून अनेक प्रकारच्या गृहउपयोगी वस्तु व खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांना उपलब्ध आहे. तसेच शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक लागणाऱ्या विविध वस्तु गोदाकाठ महोत्सवातून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाची नागरिकांना वाजवी दरात खरेदी करण्याची संधी गोदाकाठ महोत्सवाच्या रुपाने मिळाली आहे.

गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध झाले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील फूड फेस्टच्या निमित्ताने प्रदर्शन महोत्सवात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉलवर अस्सल खाद्यपदार्थांची मेजवानी घेण्यासाठी खवय्यांची झुंबड उडाली आहे
——————————
शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कला, गमतीजमती, मजा-मस्ती आणि आनंदाने भरलेला महोत्सव बच्चे कंपनीला आकर्षित करीत आहे. ——————————
आ.आशुतोष काळे यांनी बचत गटाच्या स्टॉल धारकांशी व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. दोनच दिवसात मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाली असल्याचे स्टॉल धारकांनी सांगितले.





