तिळवणी आरोग्य केंद्रास १.५० कोटी तर येसगाव, धारणगावसाठीही १.११ कोटी निधी मंजूर

तिळवणी आरोग्य केंद्रास १.५० कोटी तर येसगाव, धारणगावसाठीही १.११ कोटी निधी मंजूर

1.50 crores approved for Tilawani Health Center and 1.11 crores for Yesgaon and Dharangaon

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 31 Jan 25  16.40 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव  : यापूर्वी मंजुरी मिळविलेल्या तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला १.५० कोटी निधी तसेच नव्या येसगाव धारणगाव प्राथमिक केंद्रांना मंजुरी सह प्रत्येकी ५५.५० लक्ष याप्रमाणे १.११ कोटी असा एकूण २.६१ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.             

कोपरगाव मतदार संघाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव शहरात २८.८४ कोटी निधीतून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे.

गावातील नागरिकांना मध्यवर्ती गावात असलेल्या प्राथमिक  केंद्रांवर आरोग्य सेवा पुरवतांना येणारा ताण दूर करण्यासाठी  प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची संख्या वाढविण्यावर आ.आशुतोष काळे यांनी भर दिला  त्याच्या पाठपुराव्यातून मागील पंचवार्षिक मध्ये माहेगाव देशमुख येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाकडून मंजुरी मिळविली होती. आज महायुती शासनाने तिळवणी प्राथमिक केंद्रासाठी १.५० कोटी व येसगाव आणि धारणगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना देखील मंजुरी देवून १.११ कोटी निधी मंजूर केला आहे.

.या केंद्रांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवेच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्यामुळे लहान-मोठ्या आरोग्य समस्यांचे निदान व उपचार, लसीकरण, माता संवर्धन,बालसंवर्धन आणि नियमित आरोग्य तपासणी यांचा समावेश असल्यामुळे नागरिकांची आरोग्य व्यवस्था सांभाळण्यात मोठी मदत होते हे वैश्विक कोविडच्या महामारीत नागरिकांनी अनुभवले आहे.

 कोपरगाव मतदार संघ आरोग्यसेवेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री श्रीम. मेघनाजी बोर्डीकर यांचे आभार मानले आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page