उज्वल भविष्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळा; अभ्यास करा- सायली सोळंके

उज्वल भविष्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळा; अभ्यास करा- सायली सोळंके

Avoid excessive use of mobile phones and study for a bright future – Sayali Solanke

वकृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 31 Jan 25  16.50 Pm.By  सालकर राजेंद्र


कोपरगाव: सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपण विचार क्षमता  हरवून बसलो आहे. उज्वल भविष्यासाठी मोबाईलचा अति वापर टाळून अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले.अध्यक्षस्थानी चैताली काळे होत्या.                                   

रयतच्या काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कै.सौ. सुशिलामाई  काळे स्मृती वक्तृत्व स्पर्धा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

सायली सोळंके पुढे म्हणाल्या की,  पुस्तके आपल्याला खूप गोष्टी शिकवतात त्यामुळे यशस्वी होण्यासाठी पुस्तक वाचन केलेच पाहिजे पुस्तक हाच विद्यार्थ्याचा गुरु व्हायला हवा,  प्रत्येकाने आपल्याकडे असलेले वेगवेगळे गुण ओळखून जीवनाला आकार दिला पाहिजे सरावातून मनातील भीती निघून जाते आज केलेला अभ्यास भविष्यात उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघावीत आणि ती साकार करण्यासाठी जिवाचे रान करावे, असं सल्ला त्यांनी दिला.

यावेळी सौ.चैताली काळे म्हणाल्या, प्रत्येकाने आपली आवड जोपासली पाहिजे त्यासाठी वेळ दिला पाहिजे  विद्यार्थ्यानी सोशल मिडियाकडे आकर्षित न होता त्याचा वापर हा मर्यादित व आवश्यकते पुरताच वापर केला पाहिजे. आपल्याला आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे असेल तर आपण कोण आहात याचे चिंतन करूनच खर्‍या अर्थाने आयुष्यात पुढे जाता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.   

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर तसेच राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर कोळपेवाडी ही विद्यालये मानाच्या फिरत्या करंडकाचे मानकरी ठरले.

याप्रसंगी  अरुण चंद्रे, संभाजी काळे,  कचरु कोळपे,  बाळासाहेब ढोमसे,  डॉ.आय.के. सय्यद, श्रीमती वहाडणे, प्राचार्य प्रकाश चौरे,  प्राचार्या हेमलता गुंजाळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, सुकदेव काळे, शेख सर,  रमेश मोरे, पोपटराव येवले, सतीश नरोडे,  भाऊसाहेब लुटे, बाबासाहेब आभाळे,  उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड, सचिव सिद्धार्थ कांबळे,  सहसचिव नितीन बारगळ, निलेश डोंगरे आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रास्ताविक नितीन बारगळ यांनी तर सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले व आभार सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page