वर्षानुवर्षापासून बंद असलेला शेतकऱ्यांचा शेत रस्ता मोकळा झाला

वर्षानुवर्षापासून बंद असलेला शेतकऱ्यांचा शेत रस्ता मोकळा झाला

Farmers’ farm road, which had been closed for years, has been reopened

आ. काळे यांची सूचना तहसीलदाराची मध्यस्थी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 31 Jan 25  16.30 Pm.By  सालकर राजेंद्र

 कोपरगाव : ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणाने शेत रस्त्याचे वाद निर्माण होताना दिसतात. रस्ते अडवल्याने शेतकर्‍यांना मानसिक, आर्थिक व नुकसान सोसावे लागते. अशाच प्रकारे प्रलंबित शेत रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी काही शेतकर्‍यांनी आमदार आशुतोष काळे  यांच्याकडे तक्रार केली होती यावर त्यांनी तालुका दंडाधिकारी यांना सूचना केल्या होत्या.

त्यानुसार तालुका दंडाधिकारी महेश सावंत  यांनी शेतकर्‍यांच्या मध्यस्थी केल्याने 25 वर्षापासून कौटुंबिक वादात अडकलेला शेत रस्ता मोकळा झाला.

काय आहे नेमके प्रकरण

शिरसगाव येथील पालखेड चारी वन.एल. मायनर हद्दीत असलेला हा रस्ता कित्येक वर्षापासून बंद असल्यामुळे  ३० कुटुंबांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत होत्या. त्याबाबत काही माहिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधत आपली कैफियत मांडून रस्त्याच्या अडचणी मांडल्या होत्या.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना हा रस्ता खुला करण्याबाबत योग्य तो तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली त्यांनी केलेले मार्गदर्शन व यशस्वी  मध्यस्थीने सर्वच शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होवून त्यांचा मागील २५ वर्षापासूनचा वाद संपुष्टात येवून या रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटल्यावर बुधवारी (दि.२९) रोजी  तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते पालखेड या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात येवून  हा रस्ता अखेर शिवार वाहतुकीसाठी कायमचा खुला झाला आहे.त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे माल वाहतूक व शेती कामगिरीचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page