कोपरगावच्या इतिहासात ३२२० घरकुले  मंजुरीचा उच्चांक-  आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या इतिहासात ३२२० घरकुले  मंजुरीचा उच्चांक-  आ. आशुतोष काळे

3220 houses approved, highest number in the history of Kopargaon- A. Ashutosh Kale

 स्वप्नपुर्ती झाली आता ३३५० घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती करणार -आ.आशुतोष काळे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 31 Jan 25  17.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : पंतप्रधान  आवास योजना अंतर्गत’  पहिल्यांदाच पात्र लाभार्थ्यांना एकाचवेळी ३२२० घरकुले  मंजुरीचा झाल्याचा उंचांक झाल्याने पात्र लाभार्थ्यांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होणार आहे. आता लवकरच  ३३५० घरकुलांची उद्दिष्ट पूर्ती करणार असल्याचा ठाम विश्वास  आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.                                   

आ. आशुतोष काळे म्हणाले कोपरगाव तालुक्यात  ‘पंतप्रधान आवास  योजना  अंतर्गत  करीता ३३५० घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून ३२२० घरकुलांना मंजूरी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उर्वरित १३० घरकुलांना येत्या एक ते दोन दिवसात तातडीने मंजूरी करण्याबाबत आपला  आमदारस्तरावर पाठपुरावा सुरू आहे .                                      

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळवून देणे तसेच गरिबी रेषेखालील कुटुंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

कोपरगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात घरकुलाची मागणी होती  या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आल्याने एकाचवेळी ३२२० घरकुले मंजूर झाल्यामुळे  घराचे स्वप्न साकार होवून त्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार असल्याचे आपल्याला समाधान असल्याचे आ. काळे यांनी म्हंटले आहे.

नुकत्याच मंजूर झालेल्या घरकुल योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी काही त्रुटी किंवा अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती व जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना केले आहे.शबरी आवास व रमाई आवास योजनेचे उद्दिष्ट मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितलं आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page