कोपरगाव तालुक्यातील ५१४१ लाभार्थ्यांना पक्की घरे मिळणार.- स्नेहलता कोल्हे
5141 beneficiaries in Kopargaon taluka will get pucca houses.- Snehlata Kolhe
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! ,Sun 31 Jan 25 17.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : तालुक्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना घरांचा लाभ मिळावा यासाठी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील सुमारे ५१४१ लाभार्थ्यांना पक्की घरे मिळणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.
शासन अनेक योजना गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या सुख सुविधेसाठी राबवत आहे. गतवर्षी १६०० आणि चालू वर्षात ३५४१ मिळून ५१४१ असा ऐतिहासिक कोठा प्राप्त झाल्याने हजारो लाभार्थ्यांना पक्के घर मिळून त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे
ड वर्ग यादीचा रखडलेला प्रश्न युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे मोर्चा काढत उचलला होता. वारंवार कोपरगाव तहसील येथे समस्या निवारण बैठकीत अधिकाऱ्यांना या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी व ऑटो डिलीट सारखी प्रक्रिया सुरू असताना त्यावेळी लाभार्थ्यांना वंचित रहावे लागेल असा नियम अडकाठी करू नका अशी विनंती प्रशासनाला केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वव्यापी धोरणामुळे कोपरगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी भरीव अशी ऐतिहासिक मंजुरी मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे गतिमान सरकार म्हणून नेहमीच ओळखले जाते. दूरदर्शी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात भाजपा महायुतीची नेहमी ओळख राहिली आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी व तळागाळातील गोरगरीब समाजासाठी मोलाचे निर्णय घेण्यात सरकारचे धोरण यशस्वी ठरले आहे.
कोपरगाव तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयातून सहकार्य केले जाणार असून मंजूर यादीतील लाभार्थ्यांना प्राधान्याने हा कोटा पूर्ण करून भविष्यात उर्वरित मागणीनुसार सर्वच लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.