विवेक कोल्हेंच्यामुळे आदिवासी  जमिनीची समस्या सुटली ;” कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

विवेक कोल्हेंच्यामुळे आदिवासी  जमिनीची समस्या सुटली ;” कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

Vivek Kolhe solved the problem of tribal land; “Opens the way to get loans

जन समस्या निवारण बैठकीतून प्रश्न निकाली काढले विवेक कोल्हे

कोपरगांव: हिंगणीच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर पोटखराबा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून निकाली लावल्याने हिंगणी येथील आदिवासी बांधवांना जमिनीवर  राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे  त्यामुळे आदिवासी  समाजात समाधान व्यक्त होत आहे

विवेक कोल्हे यांचे आभार व्यक्त करताना आदिवासी बांधव
तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजिवीकेसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून वनविभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या, या जमिनींचे सपाटीकरण त्याचप्रमाणे विद्युत मोटारी आदी बाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्यामुळे आदिवासी बांधवांना या जमिनी अनेक वर्षे कसून त्यावर उपजीविका करता आली.
जमिनीवर पोट खराबा उल्लेख असल्याने कर्जासाठी येणाऱ्या अडचणी तील वस्तुस्थिती जाणून अभ्यास करून विवेक कोल्हे यांनी  प्रांताधिकारी शिर्डी यांच्यापुढे संबंधीत आदिवासी बांधवांमार्फत अपिल दाखल केले होते, त्याचा नुकताच निर्णय होवुन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीवर पोटखराबा असलेला उल्लेख दुरूस्त दिला केला त्यामुळे आता आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडुन पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज, आर्थीक सहाय आदि लाभ घेता येणार आहे. 
या कामी कै. शांताराम चंदू बर्डे या आदिवासी लाभार्थ्यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व त्यानंतर बिपीनदादा कोल्हे यांच्यामार्फत सतत पाठपुरावा केला.
           
याबददल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक  कोल्हे यांचे आभार मानले आहे.
            याप्रसंगी  कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विश्वास महाले, मनेष गाडे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब धर्मा पवार, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, रामदास शिंदे, दादासाहेब पवार, एडवोकेट प्रभाकर सारजाराम पवार, रामभाऊ किसन चंदनशिव, लक्ष्मण किसन चंदनशिव, आप्पासाहेब धर्मा पवार, छगन दादा पवार, पांडू पुंजा मोरे, चिल्हाजी एकनाथ पवार, संतोष एकनाथ चंदनशिव सुभाष शांताराम बर्डे, दत्तात्रय पुंडलिक पवार, हिराबाई निवृत्ती माळी, दत्तात्रय प्रभाकर पवार, लक्ष्मण सोपान पवार,काकासाहेब भास्कर पवार, त्रिभुवन अण्णासाहेब पवार, सुरेश लक्ष्मण चंदनशिव आदि उपस्थित होते.

चौकट – 

जनसमस्या निवारण बैठका घेऊन विवेक कोल्हे यांनी वर्षानुवर्ष शासन दरबारी  रखडलेले प्रश्न निकाली काढले आहेत त्यामुळे मतदार संघातील विविध स्तरातील नागरिकात त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण झाला आहे 

Leave a Reply

You cannot copy content of this page