शुभमंगल सावधान! सर्वधर्मीय १६ जोडप्यांचा शाही सामूहिक विवाह सोहळा, 

शुभमंगल सावधान! सर्वधर्मीय १६ जोडप्यांचा शाही सामूहिक विवाह सोहळा, 

Shubhmangal SaVadhan! Royal mass wedding ceremony of 16 couples from all religions,

संजीवनी युवा प्रतिष्ठान ५ वर्षांत १२५ वधु-वरांचे शुभविवाह

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Mon17 Feb  17.00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: आपल्या मुला, मुलीचा विवाह शाही पद्धतीने व्हावा, अशी प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इच्छा असुनही मुलांचे लग्न थाटामाटात करता येत नाही. मात्र ‘सेवा हाच धर्म मानून येथील विवेक कोल्हे यांचे संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या ५ वर्षापासून  सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे शाही विवाह लावून देत आहेत.

आतापर्यंत या सामूहिक विवाह सोहळ्यात १२५ पेक्षा अधिक वधु-वरांचे शुभविवाह झाले आहेत. रविवारी येथील अलंकापुरी नगरी संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने  सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सर्वधर्मीय १६ जोडप्यांचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. यावेळी नवविवाहित दांपत्यास मान्यवरांच्या हस्ते संसारपयोगी साहित्य भेट देवून सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे हे ५ वे वर्ष आहे.
२०२० पासून या सर्वधर्मीय विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. आजवर १२५  च्या वर विवाह पार पडले आहेत. रविवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना लग्नाचे कपडे, संसारोपयोगी वस्तू व वधूला सोन्याचे मंगळसूत्र भेट देण्यात आले.
या विवाह सोहळयात एकूण १६ विवाह लावण्यात आले. त्यात ११ हिंदू धर्माच्या जोड्या, तीन बौद्ध व दोन मुस्लिम  धर्माच्या जोडप्यांचा सामावेश आहे. दोन्ही धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे हे विवाह लावण्यात आले. 
प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे यांनी संत महात्म्यांचे पुजन करून उपस्थीतांचे  स्वागत केले.                                
  कुंभमेळा पर्वणी काळात पाचवा सर्वधर्मिय विवाह सोहळा पार पडणे ही मोठी अनुभूती आहे, सर्व धर्मीय विवाह काळाची गरज आहे – प.पू. रमेशगिरी महाराज
सर्वांमध्ये ईश्वर असून सर्वधर्मीय समाजाला एकत्र करण्याचे काम विवेक कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठान करीत आहे.- अडबंगनाथचे अधिपती ह.भ.प अरुणनाथगिरी महाराज.                
सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून माणुसकी आणि एकतेचा संदेश विवेक कोल्हे व त्यांचे सर्व स्वयंसेवक देत आहे –  मौलाना निसार                                               
सर्वांना सोबत घेऊन करीत असलेले कार्य कौतुकास्पद व पुण्यकर्म   आहे –   भंते आनंद सुमंत श्री 
 
विवेक कोल्हे यांनी प्रास्ताविकात  सेवा हाच धर्म हा विचार घेऊन माणुसकीच्या नात्याने या माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणीतून ती दरी कमी करण्यांसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने काम सुरू आहे.  संजीवनी युवा प्रतिष्ठान  आजवर वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे,मोफत फिरता दवाखाना,कोविड सेंटर,पूरग्रस्त भागात सेवा कार्य,एक राखी जवानांसाठी,गंगा आरती,प्रबोधन उपक्रम यासह हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सुरू ठेवत काम सुरू आहे. हा उपक्रम अनेकांच्या आर्थिक समस्येला उपाय ठरत आहे तर अगदी लाखोंचे पॅकेज घेणारे आय टी क्षेत्रातील वधू वर देखील यात सहभागी आजवर झाले आहेत.
अवास्तव लग्न खर्च, खर्चिक रूढी व परंपरा यातून सर्व- सामान्य कुटुंबाची सामुहिक विवाह सोहळ्यामुळे सुटका झाली. अनेक आई-वडील मुलामुलींच्या लग्नाकरिता कर्जबाजारी होण्याचे थांबले. आता मुलीचे लग्न ओझे वाटत नाही, असे मत सोहळ्यात सहभागी पालकांनी व्यक्त केले.
यावेळी विविध अध्यात्मिक संस्थांनांचे  महंत,संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, प्रणवदादा पवार यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, विविध संस्थेचे चेअरमन,संचालक,आजी माजी पदाधिकारी, निमंत्रित मान्यवर, वऱ्हाडी मंडळी,नागरिक, युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 चौकट

 

शाही विवाह मिरवणुक –

 

सन‌ई चौघड्यांची साथ, फुलांच्या व रांगोळीच्या साथीने सजलेले रस्ते, घोड्यावर आरुढ झालेले नवरदेव, बँडबाजा-संबळाची साथ, नाचण्याचा मनसोक्त आनंद घेणारी युवा पिढी, फटाक्यांची जंगी आतषबाजी, फुलांच्या अक्षदा, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाचा शाही आस्वाद, उत्तम नियोजन, तुळशीला पाणी घालणाऱ्या रेणुका कोल्हे मिरवणुकीत नाचणारे विवेक कोल्हे असा शाही विवाह सोहळा कोपरगावकरांना पहावयास मिळाला.

Leave a Reply

You cannot copy content of this page