आ. आशुतोष काळेंच्या जनता दरबारात प्रलंबित समस्यांचा नागरिकांनी वाचला पाढा! अधिकाऱ्यांची चमत्कारिक उत्तरे
Citizens read out the pending issues in A. Ashutosh Kale’s Janata Darbar! Officials’ miraculous answers
जागेवरच काही समस्यांचा निपटारा; राहिलेल्या समस्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue14Oct 10.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, व्यथा आणि अडीअडचणी समजून घेता याव्यात त्यांच्याशी संवाद करता यावा यासाठी कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांचा नागरिकांनी पाढाच वाचला. या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन जे शक्य आहेत ते प्रश्न जागेवरच त्यांनी सोडविले. इतर प्रश्न संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे देऊन तात्काळ कारवाई करून निकाली काढण्याच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या. तब्बल अडीच ते तीन तास सुरू असलेल्या या जनता दरबारास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
आ. आशुतोष काळे यांच्या वतीने सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समिती पटांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. वाळू, घरकूल योजना, रस्ते टिकत नाही, शाळेचा पट, शिक्षकांची गैरहजेरी, महिला मुख्याध्यापकाची मनमानी, ग्रामसेवकांची कमतरता, स्वतःची जागा असताना अतिक्रमण जागेवर घर बांधले, शासनाकडून कारवाई शून्य, तीन वर्षे झाले उद्घाटन झाले पण जलजीवन योजना अपुऱ्या आहेत, सरकारी योजनांची माहिती ग्रामपंचायतीकडून मिळत नाही त्यामुळे लाभापासून वंचित राहावे लागते , कामचुकार शिक्षिकेची बदली करा, अन्यथा कायदा होतात घेऊ, अतिवृष्टीने रस्ता वाहून गेला मुरूम तरी टाका, पंचनामे करीत नाहीत, गाव गोठा प्रकरण होत नाहीत, काँक्रिटीकरण होत नाही, घरकुलांना वाळू द्या, एका महिलेने भर दरबारात विनंती करते, खरेदी केलेली माझी तीन गुंठे जागा मला द्या, पोलीस संरक्षण द्या, मदत करा, माझे कुटुंब उध्वस्त झाले, आर्त टाहो एका पिढीत महिलेने जनता दरबारात फोडला, कर्मचारी सोकावले आहेत, त्यांच्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही, टोलवाटोलवी करतात, काहीजण स्वतःची जागा असून सरकारी जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधले, त्या जागेचा राजकीय हेतूने वापर होतो, तक्रार केली,पण बीडिओ ॲक्शन घेत नाहीत,आदी विभागा वरील आरोपासह समस्यांचा पाढा वाचला, यावेळी काही समस्यांचे निराकरण आ. आशुतोष काळे यांच्याकडून जागेवरच करण्यात आले.
या सोमवारी पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभाग संबंधित नागरिकांनी वरील प्रमाणे आपल्या अडचणी मांडल्या सर्वांना अडचणी ऐकून घेतल्यानंतर चोरट्या वाळू वाहतुकीवर बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले याबाबतीत गावांनी एकत्र येऊन या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, रस्ते टिकावे यासाठी साईड गटारी हव्यात,मग अधिकाऱ्यांना बोलण्यापेक्षा गावकऱ्यांनी एकत्र येऊन साईड गटारी साठी थोडी थोडी जागा दिली पाहिजे. रस्त्यांचा वापर रोज तुम्हाला करायचा आहे. आम्ही तर पाहुणे आहोत कधीमधी येऊ असेही आमदार म्हणाले, अधिकारी जर सदस्यांचीच ऐकत नसेल तर मग ग्रामस्थांची तर मला मोठी चिंता वाटते, चाल ढकल करू नका, कामचुकार कर्मचाऱ्यांना समज द्या, नोटिसा काढा, सरकारी जागेवर अतिक्रमण करून घरकुल बांधले मग त्यांना शासन निधी कसा देता ? जागेवर जाऊन पाहणी करा, शहानिशा करा, प्रसंगी ऑडिट करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. डेपोतून घरकुलासाठी वाळू मागितली, नावे टाकली पण प्रत्यक्षात वाळु मात्र दुसऱ्यालाच दिली, याची शहानिशा करा घरकुलासाठी वाळू द्या, असे आदेश आमदारांनी दिले धनगर समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांची ग्रामपंचायतीमार्फत माहिती द्या, त्यांना लाभ कसा मिळेल याबद्दल कारवाई करा, त्यांच्यापर्यंत माहिती का पोचली नाही याची चौकशी करा, सगळ्या ग्रामपंचायतींना सरकारी योजनांचे परिपत्रक पाठवा, याबद्दल काय केले याची माहिती मला द्या,असे आदेश ही त्यांनी दिले
आ. आशुतोष काळे यांनी वाळू डेपो संदर्भात जागेवरूनच भ्रमणध्वनीवरून तहसीलदार यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की डेपो मध्ये बाराशे अधिक १००० ब्रास वाळू घरकुलासाठी खुली ठेवली होती व उरलेल्या बाराशे ब्रास वाळूचा लिलाव झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली यावर आमदार काळे यांनी बाराशे ब्रास वाळूचा लिलाव रद्द करा, स्थगिती द्या, नवा आदेश येताच ज्यांना घरकुलासाठी वाळू लागते त्या ग्रामपंचायतींनी ती वाळु उचलून घ्यावी, असे त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना सांगितले. क्रमवारीनुसार अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या व कारवाई करण्याचे आदेश दिले.
भांबवल्या व गोंधळलेल्या अधिकाऱ्यांची चमत्कारिक उत्तरे
ग्रामसेवकांची कमतरता असून दोन गावाला एक ग्रामसेवक तो ही जागेवर राहत नाही या तक्रारीवर अधिकारी म्हणाले ७५ ग्रामपंचायतीला ५५ ग्रामसेवक काय करणार ?
कागदपत्रे पूर्ण करूनही गाय गोठे व काँक्रीटीकरण प्रकरणे होत नाही यावर अधिकारी म्हणाले, गाय गोठे व काँक्रिटीकरणाला सरकारनेच बंदी घातली नवीन आदेश आल्यावर बघू?
एका शिक्षिकेची दहा-पंधरा वर्षापासून बदली झाली नाही ती मनमानी करते शाळेत उशिरा येते तिची बदली करा,या तक्रारीवर ती विधवा असल्याने तिला काही सवलती देण्यात आल्याने बदली होत नाही? तालुक्यात ५० शिक्षक कमी आहेत. मुलाला मारले काळे निळे वळ उठले याची चौकशी करा असे आमदार यांनी म्हणताच अधिकाऱ्यांनी उत्तर दिले याची चौकशी करते परंतु पालकांची काहीच तक्रार राहिलेली नाही तरीही अहवाल मागवला आहे एक दोन दिवसात अहवाल येईल?
एका ग्रामपंचायत सदस्याने सरकारी जागेवर घरकुलाची अतिक्रमण झाले असून राजकीय हेतूने वापर होत आहे याबाबत ग्रामसेवकाला दोन महिन्यापूर्वी प्रस्ताव दिला परंतु सहा महिन्यापासून आजतागायत टोलवा टोलवी करून चालढकल करून कुठलीही कारवाई झाली नाही. यावर अधिकारी म्हणाले त्यांना किडनी स्टोन झालेला आहे ते आजारी आहेत अशी चमत्कारिक उत्तरे काही गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी चमत्कारिक उत्तरे दिली
प्रश्न समजून घेत जे शक्य आहे त्या प्रश्नांचा तडकाफडकी ने निर्णय केले तर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. प्रशासन गतिमान करण्यासाठी अधिकाऱ्याबरोबरच नागरिकांनीही सहकार्य करावे केवळ तक्रारी देऊन न थांबता त्याचा पाठपुरावा करावा असे सांगून आ. आशुतोष काळे यांनी जनता दरबारातून जनतेचा न्याय देण्याची काम केले जाईल असे सांगितले
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, मा.उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक अनिल कदम, राहुल रोहमारे, दिलीपराव बोरनारे, प्रशांत घुले, शंकरराव चव्हाण, दिनार कुदळे, श्रावण आसने, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवण, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन रोहमारे, तसेचतालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप,ल.पा. विभागाचे उपनिबंधक संतोष दळवी, पंडित वाघिरे, गटशिक्षणाधिकारी श्रीम. शबाना शेख, अभियंता आर.टी. दिघे, पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीम. श्रद्धा काटे, विस्तार अधिकारी तोरवणे, शाखा अभियंता सी.डी. लाटे, आरोग्य विकास अधिकारी एम.एस.पथवे, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, गणेश सोनवणे, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





