प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे राजकीय वातावरण तापले; हरकतीसाठी १७ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
Political atmosphere heated up due to errors in draft voter lists; Deadline extended to October 17 for objections
मतदारांनी अंतिम यादी डोळ्यातील घालून तपासावी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Tue14Oct 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर प्रारूप मतदारयाद्यांमधील त्रुटींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. याद्यांमध्ये हेतुपुरस्सर घोळ घातल्याचा गंभीर आरोप इच्छुक उमेदवाराकडून होत आहे. हरकती व सूचना यासाठी अंतिम मुदत १४ ऑक्टोबर होती.मात्र आता ही मुदत वाढ करून १७ ऑक्टोबर पर्यंतची करण्यात आली आहे.
, प्रभागातील कुटुंबाचे घर एकीकडे तर कुटुंबातील व्यक्तींचे नाव दुसरीकडे, कुटुंबातील एकाच कुटुंबातील व्यक्तींचे यादीत कुठल्या कुठे नावे आले आहेत एक एक नाव शोधण्यासाठी किमान एक ते दोन तास यादी चाळावी लागते. विधानसभेला मतदान केलेल्या नागरिकांची मतदारयादीतून गायब झाली आहेत. तर नावेच दोन वेगवेगळ्या प्रभागांत एकाच मतदाराचे नाव आले आहे. विशेष म्हणजे या यादीत मतदारांचे फोटो लावलेले नाहीत त्यामुळे नाव शोधण्यासाठी आणखीन वेळ लागतो. इच्छुकांपेक्षा राजकीय हस्तक्षेप वाढल्याने अनेक जणांची नावे यादीतून गायब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आलेल्या हरकतीवर योग्य ती शहानिशा झाल्याशिवाय कारवाई करू नये असा सूर नागरिकांतून उमटत आहे अन्यथा आणि निवडणुकीत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
कोपरगाव शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असून, अनेक मतदारांची नावे दुबार झाली आहेत. काहींची नावे वेगवेगळ्या विभागांमध्ये गेलेली असून, त्यामुळे मतदारांचा मोठा गोंधळ उडालेला आहे. साडेतीन ते चार हजार मतदार संख्याची यादी असल्यामुळे स्वतःचे नाव शोधण्यास विलंब लागत आहे मुळात हरकती घेणे ही गोष्ट राजकीय लोकांसाठी संधी असून लोकांच्या अपरोक्ष त्यांनी गठ्ठेची गठ्ठे हरकती घेऊन पालिकेकडे सादर केलेल्या आहेत अनेकांनी खोट्या खोटी कागदपत्रे व खोट्या सह्या करून एकमेका विरोधक हरकती नोंदवलेल्या असल्याचे कळते. मंगळवारी १४ ऑक्टोबर पर्यंत साधारण ३२०० ते ३५०० हरकती पालिकेकडे जमा झालेल्या होत्या, आता त्यात आणखी तीन दिवसाची मुदत वाढ झाल्यामुळे हरकती व सूचनांचा अक्षरशः पाऊस पडण्याची शक्यता आहे. ७० ते ८० टक्के हरकती या बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुळात विधानसभेची यादी वापरण्यात येणार असल्याने हरकतीचा शक्यतो प्रश्न निर्माण होत नाही काही इच्छुकांनी आपल्याला नको असलेल्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्याची संधी मिळालेली आहे. अनेकांनी आपल्या प्रभागात शेजारच्या प्रभागातील दोनशे तीनशे नावे वाढविल्याची तर काहींनी आपल्या प्रभागातील दोन-तीनशे नावे कमी केल्याच्या हरकती घेतल्या असल्याचे कळते
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला आलेल्या हरकतीवर अतिशय गांभीर्याने नजर ठेवून शहानिशा करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा या राजकीय लुटमारीत सामान्य नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण अधिकारी आहेत त्याचबरोबर शहरातील अनेक तरुण देखील वारसा हक्काने अनुकंपा खाली नोकरीस आल्याने ते आपल्या परीने चोख काम करीत आहेत. परंतु मतदारांपेक्षा राजकीय पक्षाच्या कर्मचाऱ्यांचा सध्या नगरपालिकेत मोठा वावर व हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेक ठिकाणी मतदार यादी मध्ये हरकतीच्या नावाखाली फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना आणखी डोळ्यात तेल घालून हरकतींची शहानिशा करावी लागणार आहे. तसेही मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी कडक धोरण घेतल्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही निश्चितच मतदारांना न्याय मिळेल. अशी आशा वाटते
चौकट
निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी वापरली जाते. त्याबाबत कुणाच्या हरकती-सूचना असतील, तर त्या नोंदविण्यासाठी नगरपरिषदेने वेबसाइटवर व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन आवाहन केलेले आहे. हरकती व सूचना येथील त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाच्या नियमावली अधीन ज्या हरकती आल्या आहेत. त्याबाबत नोटीस देऊन प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन शहानिशा करूनच हरकती व सूचना याबाबत निर्णय घेणार आहोत-सुहास जगताप कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक





