दत्त जयंतीनिमित्त साई तपोभूमीत हरिकीर्तन व भंडारा
Harikirtan and Bhandara at Sai Tapobhoomi on the occasion of Datta Jayanti
४ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. भक्तिमय कार्यक्रम
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 3Dec 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव श्री साईबाबा तपोभूमी मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरुवार, दि. ४ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. सुवर्णामाई जमधडे यांच्या जाहीर हरिकीर्तनाचे तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक ६ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून भक्तांसाठी हा सोहळा विनामूल्य खुला आहे.
मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाल्याने हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत गुरूपरंपरेचे विशेष स्थान आहे. यंदा दत्त जयंती गुरुवारी आल्यामुळे श्रद्धाळूंमध्ये विशेष उत्साह दिसत आहे.
श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंतीचा सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. श्री साई सेवा प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने हरिकीर्तन, नामस्मरण आणि भंडाऱ्याची भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त जयंतीचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views:
18





