विरोधक म्हणून एकदाही अवैध धंद्यांविरोधात उभं राहिलात का?” —कृष्णा आढाव

विरोधक म्हणून एकदाही अवैध धंद्यांविरोधात उभं राहिलात का?” —कृष्णा आढाव

“As an opposition party, have you ever stood up against illegal businesses?” —Krishna Adhav

अवैध धंद्यांवरून कोपरगावात राजकारण तापलं;

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 3Dec 22.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा मुद्दा तापलेला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी आज भाजप शहराध्यक्ष आणि कोल्हे गटावर थेट प्रहार करत आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

अवैध धंद्यांविरोधात आशुतोष काळेंनी घेतलेली भूमिका ठाम, कठोर आणि थेट आहे… पण कोल्हेंनी कधीही प्रामाणिक विरोधकाची भूमिका निभावली का?” असा सरळ सवाल करून आढावांनी विरोधकांना कोपऱ्यात पकडले.

आ. आशुतोष काळे यांनी सहा वर्षात अनेकदा पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अवैध धंदे बंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मात्र काही दिवस कारवाई आणि पुन्हा त्याच धंद्यांना उत आले,या चक्राविरुद्ध त्रस्त नागरिकांच्या दबावामुळेच काळेंनी शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट निवेदन देत निर्णायक पाऊल उचलल्याचा उल्लेख आढावांनी केला.

“अवैध धंद्यांचा मुळापासून बिमोड करायचा असेल तर वरच्या स्तरावरूनच आदेश लागतात,काळेंनी ते काम करून दाखवले. विरोधक मात्र सोशल मीडियावर बोटं उचलण्यात व्यस्त,” कोल्हे आणि त्यांच्यासोबतचे स्वयंघोषित नेते यांनी एकदाच अवैध धंद्यांवर तोंड उघडले आहे का? विरोधक म्हणून भूमिका मांडली का? आंदोलन केलं का? निवेदन दिलं का?” असा सवाल आढाव यांनी केला.

आरोप करताना कृष्णा आढाव म्हणाले अवैध धंद्यांना मिळणाऱ्या पाठबळामुळेच हे धंदे करणारे लोक उन्मत्त झाले आणि नागरिकांना त्रास देऊ लागले. आता आशुतोष काळे यांच्या कारवाईच्या हालचाली वाढल्याने या धंद्यांना ‘दिवस मोजले गेले’ अशी भीती अवैध व्यवसायिकांना वाटू लागली असून, याच भीतीने कोल्हे गट आक्रमक दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

आढावांनी भाजप शहराध्यक्षांच्या आरोपांनाही तितक्याच धारदार शब्दांत उत्तर दिले.“आपल्या कार्यकर्त्यावर खोटे आरोप करून तोच कार्यकर्ता नगरपरिषद निवडणुकीत दुसऱ्या प्रभागात ढकलून उमेदवारी देणे… हे कोणाच्या दबावाखाली? आणि कशासाठी? कोपरगावकर समजदार आहेत.”

कृष्णा आढावांनी सरळ भाषेत निशाणा साधला,“कोपरगावकरांनी काळेंनी घेतलेल्या निर्णयात्मक भूमिकेचे स्वागत केले… आणि हेच कोल्हे पचवू शकले नाहीत.”

अवैध धंद्यांवरून राजकारण तापत असताना, राष्ट्रवादीने घेतलेली ही आक्रमक भूमिका आता कोपरगावच्या निवडणूक वातावरणाला आणखीच धारदार बनवणारी ठरणार हे निश्चित.

चौकट 

“आ. आशुतोष काळे यांनी अवैध धंद्यांवर जी कठोर भूमिका घेतली—
ती भूमिका तुम्ही तुमच्या कार्यकाळात कधी घेतली का?आणि राज्यस्तरावर निवेदन देण्याची हिंमत तुम्ही दाखवली का?काळेंच्या भूमिकेशी तुम्ही असहमत आहात का?की अवैधधंद्यांच्या गप्प पाठीराख्यांना दुखापत होऊ नये म्हणून तुम्ही शांत बसलात?” कृष्णा आढाव राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हा कार्याध्यक्ष

Leave a Reply

You cannot copy content of this page