हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जड वाहनांची दादागिरी!
Heavy vehicles are dominating the Samruddhi Highway, the leader of Hindutva, Balasaheb Thackeray!
नियम धाब्यावर – छोट्या वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास
लेनचे शिस्तपालन गायब, ओव्हरटेकला अडथळे, कॅमेरे व कठोर कायद्यांची तातडीची गरज
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 5Dec 8.10Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: समृद्धी महामार्ग हा आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी देशभरात गाजलेला प्रकल्प… पण या हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जड वाहनांची सुरू असलेली दादागिरी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे.
महामार्गावरील अनेक ट्रक, ट्रेलर चालक कोणत्याही वाहतुकीच्या नियमाचे पालन न करता, एकाच वेळी तीनही लेन व्यापून स्वतःच्या मनमानी पद्धतीने वाहन चालवत आहेत. त्यामुळे छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी अक्षरशः जीव मुठीत घेऊन रेस करावी लागते.
लेन-शिस्त पूर्ण कोलमडली – अपघाताची भीषण शक्यता,ज्या लेनमध्ये जड वाहन असावे, त्या लेनमध्ये न राहता चालक मनमानी पद्धतीने इकडून तिकडे वळतात.कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक लेन बदलण्यामुळे छोटे वाहन चालक मोठ्या संकटात सापडतात.पहाटेच्या वा सकाळच्या वेळेत काही चालक मोबाईलवर बोलताना, झोपेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे अनेकदा दिसते.चार-पाच ट्रक एकाच रांगेत निघून पूर्ण रस्ता अडवतात आणि छोट्या वाहनांना ओव्हरटेकची संधीच मिळत नाही.ही स्थिती जड वाहनचालकांची मनमानीच नव्हे तर अपघातांना आमंत्रण ठरत आहे.
सूचना फलक असूनही नियमांकडे दुर्लक्ष – सुरक्षारक्षकांनी घ्यावी तातडीने दखल
वारंवार सूचना फलक असतानाही अनेक जड वाहन चालक नियम पायदळी तुडवत आहेत.समृद्धी महामार्गावरील सुरक्षारक्षक आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन शिस्त लावण्याची गरज आहे.
कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक – तीन भाषांतील सूचना फलक अनिवार्य समृद्धी महामार्गावरील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत. महामार्गावर प्रवेशद्वारांवर हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीन भाषांमध्ये नियमांचे स्पष्ट मार्गदर्शक फलक लावावेत.
यामुळे बाहेरील राज्यातील चालकांनाही लेन शिस्त, ट्रॅफिक नियम आणि वेगमर्यादा यांची स्पष्ट माहिती मिळेल.समृद्धी महामार्गाची संकल्पना – सुरक्षितता आणि वेळ वाचवणे… पण ट्रक मनमानीने सर्व माती
समृद्धी महामार्गाची संकल्पना वेगवान व सुरक्षित प्रवास निर्माण करणे ही होती. परंतु काही ट्रक आणि ट्रेलर चालकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे या संकल्पनेलाच तडा जात आहे.
अपघात रोखायचे असतील तर कडक कायदे आणि दंडात्मक कारवाई तातडीने लागू करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
प्रशासनाला जागे करणारी मागणी
जड वाहनांची सुरू असलेली दादागिरी, नियमांचे उघड उघड उल्लंघन आणि छोट्या वाहनांच्या सुरक्षिततेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.
Post Views:
3





