चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या माध्यमांना तहसीलदार महेश सावंत यांचा धारदार इशारा 

चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या माध्यमांना तहसीलदार महेश सावंत यांचा धारदार इशारा 

Tehsildar Mahesh Sawant’s sharp warning to media outlets spreading false information

बातमी खरी हवी, फेक बातम्यांवर सरळ कारवाईचा इशारा 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 4Dec 18.10Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी, दिशाभूल करणारी किंवा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारी “फेक” बातमी चालवणाऱ्या प्रसारमाध्यमांना थेट कारवाईचा धारदार इशारा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिला.

निवडणूक संबंधी कार्यक्रमाच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की,जनतेला चुकीची माहिती देणाऱ्या, वातावरण तापविणाऱ्या किंवा मतदारांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही माध्यमावर कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.”

सावंत यांनी स्पष्ट केले की निवडणूक संहितेचे उल्लंघन, तथ्यहीन बातम्या, पक्षपाती पद्धतीने फिरवली जाणारी दिशाभूल किंवा उमेदवारांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी चुकीची वार्ता ही कुठल्याही माध्यमाकडून सहन केले जाणार नाही.

ते पुढे म्हणाले,बातमी हवी, पण खरी हवी. निवडणूक ही जनतेचा उत्सव आहे… कुणाचाही तिखट मसाला लावून जनमताला कलाटणी देण्याचा प्रयत्न झाला, तर थेट दंडात्मक कारवाई होणार. आवश्यक वाटल्यास गुन्हादेखील दाखल करू.”

पत्रकार परिषदेत सावंत यांनी माध्यमांना सावध करताना सांगितले की निवडणूक आयोगाकडील अधिकृत माहिती व आकडेवारी सोडून इतर कोणतीही गैरअधिकृत, अफवांवर आधारित बातमी प्रसिद्ध करू नये. तसे आढळल्यास संबंधित माध्यमांना नोटीस, कारवाई आणि प्रसारण रोखणे यासारखे कठोर निर्णय घेतले जातील.

 चौकट 

आजकाल कोणाच्याही मोबाईलमधून, कोणत्याही सोशल मीडियावर कोणीही, कधीही, कोणावरही टीका करून “बातमी” बनवून टाकण्याचा नवा ट्रेंड. निर्माण झाला आहे विशेष म्हणजे तथ्यांची खात्री नाही, जबाबदारी नाही… पण प्रसार मात्र वाऱ्यासारखा,मात्र आता ही मनमानी चालणार नाही कारण  तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिलेल्या स्पष्ट इशाऱ्यानंतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा, दिशाभूल आणि बनावट बातम्यांना “आळा” बसणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page